पुसेगाव ग्रामसभा

पुसेगावची ग्रामसभा अर्ध्यावरच तहकूब; ग्रामस्थांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने नाराजी

Pusegaon Gram Sabha: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात मंगळवारी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, ग्रामसभा गावापासून दूरच्या ठिकाणी आयोजित केल्याने सुरुवातीपासूनच ग्रामस्थांमध्ये नाराजी

पुसेगावची ग्रामसभा अर्ध्यावरच तहकूब; ग्रामस्थांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने नाराजी

Pusegaon Gram Sabha

पुसेगाव (Pusegaon Gram Sabha) : येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात मंगळवारी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, ग्रामसभा गावापासून दूरच्या ठिकाणी आयोजित केल्याने सुरुवातीपासूनच ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर दिसून आला. 

त्यातच ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना ग्रामविकास अधिकारी यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याची भावना व्यक्त झाल्याने ग्रामसभेत काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.  बर्‍याच दिवसांनंतर ग्रामसभा होत असल्याने ग्रामस्थ मोठ्या अपेक्षेने उपस्थित होते. मात्र, सभेचे ठिकाण गावापासून दूर असल्याने अपेक्षेप्रमाणे ग्रामस्थांची उपस्थिती दिसून आली नाही. उपस्थित ग्रामस्थांनी गावातील विविध समस्या, विकासकामे तसेच नागरिकांच्या अडचणींबाबत प्रश्न उपस्थित केले.

या (Pusegaon Gram Sabha) प्रश्नांवर अपेक्षित व समाधानकारक माहिती मिळत नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. प्रश्नोत्तराच्या वेळी वातावरण तापल्याने ग्रामसभेत काही काळ गोंधळ निर्माण झाला. परिस्थिती नियंत्रणात न आल्याने अखेर ग्रामसभा अर्ध्यावरच तहकूब करण्याची वेळ आली. दीर्घ कालावधीनंतर आयोजित करण्यात आलेली ग्रामसभा नागरिकांच्या अपेक्षेप्रमाणे पार पडली नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

‘सामान्य नागरिकांचे प्रश्न मांडण्यासाठी ग्रामसभा हे महत्त्वाचे व्यासपीठ असताना प्रश्नांची समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने अनेक प्रश्न अनुत्तरितच राहिले,’ अशी भावना ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे. ग्रामसभा अधिक प्रभावीपणे आणि ग्रामस्थांच्या सोयीच्या ठिकाणी आयोजित करून नागरिकांच्या प्रश्नांना स्पष्ट व समाधानकारक उत्तरे मिळावीत, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.