सीईओ विवेक गायकवाड यांच्या प्रश्नाने एसी मध्ये बसलेल्या शिक्षकांना फुटला दरदरून घाम*
वसमत (Vasmat Guru Gaurav Ceremony) : "तुमच्यापैकी किती शिक्षकांची मुले जिल्हा परिषद शाळेत शिकतात हात वर करा" असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी केले व एसी सभागृहात प्रचंड संख्येने बसलेल्या शिक्षकांना दरदरून घामच फुटला. कारण हात वर करणारे पाच सातच निघाले त्यातील चार जण तर शिक्षकच नव्हते विवेक गायकवाड यांनी वसमत येथील गुरु गौरव सोहळ्यात जिल्हा परिषद शिक्षकांना तुम्ही शिकवता त्या शाळेवरच तुमचा विश्वास नाही का?, असा मार्मिक सवालही केला. सीईओ गायकवाड यांचे भाषण चर्चेचा विषय ठरले आहे.
वसमत येथे आमदार राजू पाटील नवघरे यांच्या पुढाकाराने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गुरु गौरव पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यात 72 शिक्षकांना गुरु गौरव पुरस्कार देण्यात आला या (Vasmat Guru Gaurav Ceremony) कार्यक्रमासाठी आमदार राजू पाटील नवघरे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड उपविभागीय अधिकारी विकास माने तहसीलदार सारंगा चव्हाण , कन्हैया बाहेती, बाळूमामा ढोरे सभापती तानाजी पाटील बेंडे यांच्यासह विविध पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. या गुरु गौरव सोहळ्यात 72 शिक्षकांना सन्मान देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने जिल्हा परिषदेचे शिक्षक त्यांचे कुटुंबीय व शिक्षक मंडळी उपस्थित होते.

या समारंभात मार्गदर्शन करताना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी तुमच्यापैकी किती शिक्षकांची मुले जिल्हा परिषद शाळेत शिकतात अशांनी हात वर करावे असे आवाहन करतात वातानुकूलित असलेल्या सभागृहात बसलेल्या शिक्षकांना दरदरून घाम फुटला.
आवाहनानंतर दोन मिनिटं कोणीच हात वर केला नाही नंतर एका मागे एक पाच सात जणांचे हात वर झाले त्यापैकी चार जण शिक्षक नव्हते सभागृहात पाचशे ते सहाशे शिक्षक उपस्थित होते त्यापैकी 72 जन पुरस्कार प्राप्त शिक्षक होते पुरस्कार प्राप्त शिक्षकांपैकी हात वर करणारे पैकी एकही पुरस्कार प्राप्त शिक्षक नव्हता हे विशेष.
तुमची मुले तुमच्या शाळेत का शिकत नाहीत असा प्रश्न केल्याने पुरस्कार प्राप्त शिक्षक व उपस्थित सर्व शिक्षकांना दरदरून घाम कुठला.
जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक हे तज्ज्ञ असून त्यांना शासनाकडून चांगला पगार मिळतो. त्याउलट खासगी शाळांमध्ये अनेकदा तुलनेने अल्प पगारावर बी.ए., बी.कॉम आदी शिक्षण घेतलेले शिक्षक अध्यापन करतात. तरीही पालक खासगी शाळांसाठी मोठी फी भरून आपल्या मुलांना तेथे पाठवतात. मग जिल्हा परिषद शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांची स्वतःची मुले मात्र कुठे शिकतात? असा प्रश्न गायकवाड यांनी उपस्थित केला.
याच मुद्यावर सीईओ गायकवाड यांनी उपस्थित शिक्षकांना थेट आवाहन केले—“तुमची मुले जिल्हा परिषद शाळेत शिकत असतील तर हात वर करा.”
यानंतर सभागृहात नजर फिरवली असता जेमतेम पाच-सात जणांनी हात वर केल्याचे दिसून आले. त्यातही धक्कादायक बाब म्हणजे हात वर करणाऱ्यांपैकी चार जण जण शिक्षकच नव्हते, अशी चर्चा कार्यक्रमस्थळी रंगली.
ज्यांच्या खांद्यावर जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्याची जबाबदारी आहे, त्या शिक्षकांपैकी स्वतःची मुले जिल्हा परिषद शाळेत शिकविणाऱ्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी असल्याचे चित्र या प्रसंगातून समोर आले.स्वतः या शाळेत शिकवता येथे पगार उचलता त्याच शाळेत शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांचा स्वतःचा विश्वास किती आहे? हा प्रश्न या निमित्ताने ऐरणीवर आला आहे.
गुरु गुरु कार्यक्रम अत्यंत सुरेख पद्धतीने पार पडला आमदार राजू पाटील नवघरे यांचे सहकारी व सेवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी नियोजनबद्ध पद्धतीने कार्यक्रम घेतला तालुकाभरातील विद्यार्थी प्रिय शिक्षक व सचोटीने कार्य करणाऱ्या शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली या कार्यक्रमाचे शिक्षक मंडळी व सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
सीईओ मार्मिक भाषणाने शिक्षक हादरले
गुरु गौरव समारंभात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी शिक्षकांना आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडेल असे मुद्दे उपस्थित केले. तुम्ही जेथे नोकरी करता शासनाचा पगार घेता कुटुंब चालवता मात्र तुमच्याच कामावर तुमच्यावर तुमच्या शाळेवर तुमच्या विश्वास नाही तुमची मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत मोठी मोठी फी घेऊन तुम्ही शिकवता तुमच्या नातेवाईकांची मुले ही जिल्हा परिषद शाळेत शिकत नाहीत त्यामुळे जिल्हा परिषद शाळेचा दर्जा घालवत आहे जेथे तज्ञ शिक्षक नाहीत. अल्प पगार मिळतो तेथे मात्र तुमची व तुमच्या नातेवाईकांची मुले शिकवत असतील तर जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी कोण पाठवेल असा मार्मिक सवाल विवेक गायकवाड यांनी केला.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या प्रश्नाने व वास्तववादी वक्तव्याने उपस्थित अबाग झाले. मात्र त्यांचे भाषण अनेकांच्या काळजाला छेदून गेल्याने त्यांचे भाषण संपल्यानंतर टाळ्या ही कमी वाजल्या यावरून नेमका काय अर्थ काढावा हे उपस्थित त्यांना समजले नाही.