वसमत (Vasmat Maratha Samaj Rally) : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उपोषणास बसलेले संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी वसमत तालुक्यात सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. ते अंतर्गत शुक्रवारी बाबुळगाव सर्कल व टेंभुर्णी सर्कल मधून भव्य ट्रॅक्टर रॅली तहसील कार्यालयावर काढण्यात आली या ट्रॅक्टर मोर्चामध्ये प्रचंड संख्येने मराठा समाज बांधव सहभागी झाले होते. ट्रॅक्टर रॅलीमुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक विस्कळीत झाली होती.
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण प्रारंभ केले आहे या उपोषणाचा 14 वा दिवस ओलांडला आहे. त्यामुळे या उपोषणाला मराठा समाज बांधवांकडून प्रचंड मोठा प्रतिसाद पाठिंबा मिळत आहे वसमत तालुक्यात आंदोलन सप्ताह प्रारंभ करण्यात आलेला आहे. त्या अंतर्गत दररोज दोन सर्कल मधून कार्यकर्ते रॅली द्वारे वसमत तहसील कार्यालयावर धडकत आहेत त्यामुळे वसमत तालुक्यात आंदोलन तापलेले आहे.
शुक्रवारी बाबुळगाव सर्कलमधून प्रचंड मोठी रॅली ट्रॅक्टर रॅली वसमत तहसील कार्यालय येऊन धडकली. या रॅलीमध्ये प्रचंड मोठ्या संख्येने ट्रॅक्टरसह मराठा समाज बांधव सहभागी झाले होते तसेच टेंभुर्णी सर्कलमधूनही प्रचंड मोठी ट्रॅक्टर रॅली वसमत तहसील कार्यालयावर आली. दोन सर्कल म्हणून स्वतंत्र दोन मोठ्या रॅली वसमत मध्ये आल्याने वसमत शहरात व राष्ट्रीय महामार्गावर जिकडेतिकडे प्रचंड मोठी गर्दी पहावयास मिळाली वसमत तालुक्यात मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलनाला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत आहे वातावरण तापलेले आहे.
मोठ्या संख्येने समाज बांधव व वाहन या रॅलीमध्ये सहभागी झाल्याने राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची कोंडी झाली होती. तहसील परिसरमराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ दिलेल्या घोषणांनी गजबजून गेला होता. आंदोलनात मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव सहभागी झाले असे तरी अत्यंत शांततेत व नियोजनबद्ध पद्धतीने आंदोलन सप्ताह पार पडत आहे.
वसमत मराठा समाज रॅली
वसमत तहसील कार्यालयावर बाभूळगाव व टेंभुर्णी सर्कल मधील मराठा समाजातर्फे ट्रॅक्टर रॅली
Vasmat Maratha Samaj Rally: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उपोषणास बसलेले संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी वसमत तालुक्यात सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन
By :
देशोन्नती वृत्तसंकलन »
•
Vasmat Maratha Samaj Rally
टैग्स:
Vasmat Maratha Samaj Rally