जनगणना २०२७

जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला १ मे पासून सुरुवात

Census 2027: १ मे पासून वसमत तालुक्यात जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला सुरुवात होईल, ज्यात घरोघरी जाऊन ३४ महत्त्वपूर्ण बाबींची माहिती संकलित केली जाणार आहे.

जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला १ मे पासून सुरुवात

Census 2027

वसमत तालुक्यात प्रगणक घरोघरी
 नागरिकांच्या घरातील ३४ बाबींची होणार नोंद

हिंगोली (Census 2027) : देशाच्या विकास आराखड्याचा पाया मानल्या जाणार्‍या जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला १ मेपासून वसमत तालुक्यात होत आहे. या महत्त्वपूर्ण उपक्रमासाठी प्रशासनाने १९७८ प्रगणक, ३४३ पर्यवेक्षक आणि फिल्ड ट्रेनर्स सज्ज झाले असून संपूर्ण प्रक्रियेसाठी २०२६ गट तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक घरातील मूलभूत सुविधा, कुटुंबांची रचना आणि सामाजिक स्थितीचा सविस्तर तपशील संकलित केला जाणार आहे.

 तहसीलदार डॉ. विनोद ढोणगावकर यांनी सांगितले की, जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घरगुती व घर गणना करण्यात येणार आहे. या (Census 2027) अंतर्गत घरातील खोल्यांची संख्या, मोबाईल, संगणक, वाहन, शौचालय, पिण्याचे पाणी, प्रकाश व्यवस्था, सांडपाणी व्यवस्थापन, स्वयंपाकासाठी वापरले जाणारे इंधन, कुटुंबातील सदस्य, विवाहित जोडपी, घराची मालकी यांसह एकूण ३४ बाबींवर माहिती संकलित केली जाणार आहे. १५ दिवसांची ऑनलाईन स्वयं-गणना सुविधा १ मेपासून नागरिकांना ऑनलाईन स्वयं-गणनेची सुविधा देण्यात आली असून पुढील १५ दिवसांत अधिकृत जनगणना पोर्टलवर माहिती भरता येणार आहे. माहिती भरल्यानंतर प्रत्येक कुटुंबाला युनिक आयडी मिळणार असून प्रगणकांच्या भेटीवेळी तो सादर करणे आवश्यक राहणार आहे. त्यामुळे माहितीची पडताळणी जलद व अचूक होणार आहे. प्रशासनाची जय्यत तयारी बसमत जनगणना प्रशासनाने प्रशिक्षण पूर्ण केले आहे.

सर्व कर्मचारी प्रत्यक्ष सर्वेक्षणासाठी सज्ज असून घराघरांत भेट देत माहिती संकलन करणार आहेत. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी नागरिकांनी ही राष्ट्रीय जबाबदारी समजून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. दुसरा टप्पा फेब्रुवारी २०२७ मध्ये जनगणना प्रक्रियेचा दुसरा टप्पा फेब्रुवारी २०२७ पासून सुरू होणार असून त्यामध्ये प्रत्यक्ष लोकसंख्या गणना केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात घर व सुविधांची माहिती, तर दुसर्‍या टप्प्यात व्यक्तीनिहाय सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक माहिती नोंदविण्यात येणार आहे. देशाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या उपक्रमात वसमत तालुक्यातील सर्व नागरिकांनी अचूक माहिती देऊन सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन चार्ज अधिकारी डॉ. विनोद ढोणगावकर यांनी केले आहे.

संबंधित सामग्री

वसमत तालुक्यात सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन

वसमत तालुक्यात सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन

Sakal Maratha Samaj: वसमत येथे सकल मराठा समाज बांधवांची बैठक पार पडली या बैठकीत संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आठवडाभर शांततेच्या मार्गाने आंदोलन

Sep 06, 2026
जातीनिहाय जनगणनेसाठी अधिसूचना जारी...आता सांगावे लागणार जात, धर्म, भाषा, शिक्षण...

जातीनिहाय जनगणनेसाठी अधिसूचना जारी...आता सांगावे लागणार जात, धर्म, भाषा, शिक्षण...

Caste Census 2026: जातनिहाय जनगणनेमध्ये नाव, लिंग, जन्मतारीख, वय, वैवाहिक स्थिती, राष्ट्रीयत्व, धर्म, जात, मातृभाषा साक्षरता, डिजिटल साक्षरता, शैक्षणिक उपस्थिती, सर्वाधिक शिक्षण, रोजगाराची स्थिती, घर

Aug 14, 2026
कर्जमुक्ती प्रक्रियेला वेग: पात्र शेतकऱ्यांचा तपशील संकलनाची जबाबदारी बँकांवर निश्चित

कर्जमुक्ती प्रक्रियेला वेग: पात्र शेतकऱ्यांचा तपशील संकलनाची जबाबदारी बँकांवर निश्चित

Farmer Loan Waiver Yojana: “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना” जाहीर केली असून या योजनेचा लाभ ५६ लाख शेतकऱ्यांना मिळणार असून सुमारे ३६ हजार ५०० कोटी रुपये योजना

Jun 29, 2026
कळमनुरीची लोकसंख्या २८ हजारांच्या पार; जनगणनेच्या प्राथमिक टप्प्यात ७,३२६ घरांची नोंद

कळमनुरीची लोकसंख्या २८ हजारांच्या पार; जनगणनेच्या प्राथमिक टप्प्यात ७,३२६ घरांची नोंद

शहराची प्राथमिक लोकसंख्या २८ हजार ८७६ इतकी नोंदविण्यात आली आहे.

Jun 06, 2026
रिसोड तालुक्यात जनगणना २०२७ मोहिमेला वेग

रिसोड तालुक्यात जनगणना २०२७ मोहिमेला वेग

Risod Census 2027: रिसोड तालुक्यात जनगणना २०२७ मोहिमेत तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या नेतृत्वाखाली कर्मचारी उत्कृष्ट कामगिरीसाठी सन्मानित केले गेले. बीएलओंच्या दुधरबदारीत अचूक कार्य

May 27, 2026