वसमत अतिक्रमण हटाव मोहीम

वसमत शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू; नागरिक व प्रशासन सक्रिय

Vasmat Encroachment Campaign: वसमतमध्ये नगरपालिका व पोलिसांच्या मदतीने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाली आहे. रहदारीसाठी अवघड झालेल्या रस्त्यांवरील अतिक्रमण हटवून रहदारी सुलभ केली जात आहे.

वसमत शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू; नागरिक व प्रशासन सक्रिय

Vasmat Encroachment Campaign

वसमत (Vasmat Encroachment Campaign) : वसमत शहरातील बाजारपेठेतील रहदारीला अडथळा करणारे अतिक्रमण हटवण्याची मोहीम नगरपालिकेने हाती घेतली आहे पोलीस प्रशासनाच्या मदतीने अतिक्रमण हटवले जात आहेत त्यामुळे बाजारपेठेतील रहदारीचा प्रश्न सुटणार आहे रस्ते मोकळे करण्याच्या कारवाईचे वसमत शहरातील नागरिकांकडून स्वागत होत आहेत. 

वसमत शहरात (Vasmat Encroachment Campaign) कारंजा चौक ते पोलीस स्टेशन, मामा चौक ते झेंडा चौक, झेंडा चौक ते महावीर चौक, कारंजा चौक ते राष्ट्रीय महामार्ग, न्यायालयाच्या समोरील रस्ता या रस्त्यांवर वाहन चालवणे अवघड होऊन बसले आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला हात गाडी टपर्‍या त्यांचे अतिक्रमण झाले आहे सोबतच रस्त्याच्या मधोमध रहदारीला अडथळा होईल अशा पद्धतीने हात गाडी लावल्या जात आहेत. बाजारपेठेतील व्यापारी दुकानांसमोर सामानांच्या उतरंडी ठेवतात त्याच्यासमोर ग्राहकाच्या दुचाकीची गर्दी असते रस्त्याच्या दोन्ही बाजूला असा प्रकार असल्याने बाजारपेठेतून पायी चालणे हे अवघड होत असे  कापड बाजारात तर दर तासाला रहदारी ठप्प होण्याचा प्रकार घडतो दोन कापड विक्रेत्यांच्या दुकानासमोर सर्वाधिक दुचाकींची गर्दी असे त्यातूनच वसमत शहराचा रहदारीचा प्रश्न जटिल बनला आहे. 

कारंजा चौक ते पोलीस ठाणे या रस्त्यांवर रस्त्याच्या मधोमध हातगाड्या व दोन्ही बाजूला अतिक्रमणे वाढल्याने या रस्त्यावरून पायी चालणे सुद्धा अवघड झाले होत आहेत या प्रकारासंदर्भात नागरिक वाहनधारक कायम तक्रारी करतात त्या तक्रारीची दखल अखेर प्रशासनाने घेतली आहे नगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाने मिळून संयुक्त मोहीम बुधवारपासून राबवणे सुरू केले आहे.

 अंतर्गत रहदारीला अडथळा करणारे रस्त्याच्या बाजूचे अतिक्रमण हातगाडे हटवून रस्ता रहदारीसाठी मोकळा केला जात आहे या मोहिमेमध्ये मुख्याधिकारी रफिक कंकर, पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांच्यासह नगरपालिकेचे सर्व कर्मचारी, पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी सहभागी झाले आहेत. सकाळपासून सायंकाळपर्यंत ही मोहीम सुरू होती त्यामुळे शहरातील मुख्य रस्ते रहदारी करण्यासाठी मोकळे होत असल्याचे पहावयास मिळत आहे.

शहरातील नागरिकांना रहदारीसाठी त्रास होणार नाही यासाठी उपाययोजना कराव्यात अशा सूचना आमदार राजू पाटील नवघरे यांनी दिल्या होत्या त्यानंतर नगरपालिकेचे नगराध्यक्ष, पदाधिकारी मुख्याधिकारी यांनी मोहीम हाती घेतली पोलीस निरीक्षक सुधीर वाघ व त्यांच्या कर्मचार्‍यांनी चोख पोलीस बंदबस्त दिला व्यवसाय करण्यासाठी कोणाला हरकत नाही मात्र रहदारी ठप्प होऊ देऊ नका अशा सूचना यावेळी प्रशासनाने विक्रेत्यांना दिल्या शहरातील रस्ते 

संबंधित सामग्री

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भूत काढण्याच्या बहाण्याने अघोरी विधी करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. सौरभ नाना मदने याला अटक झाली असून POCSO अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

Oct 07, 2026
MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

पुण्यातील MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेऊन अभ्यासावर लक्ष द्यावे, असे न्यायालयाने सांगितले.

Oct 07, 2026
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेश केल्याच्या आरोपावरून राहुल गांधी आणि प्रियंका गांधींसह विरोधी नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांनी FIR दाखल केला.

Oct 07, 2026
पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
वाहतूक यंत्रणेचा अजब कारभार! दुचाकीला सीटबेल्ट, कारला हेल्मेट!

वाहतूक यंत्रणेचा अजब कारभार! दुचाकीला सीटबेल्ट, कारला हेल्मेट!

Traffic System E-Challan: दुचाकीस्वाराला सीटबेल्ट न लावल्याबद्दल, तर कारचालकाला हेल्मेट न घातल्याबद्दल दंड ठोठावल्याचा अजब प्रकार ओडिशात समोर आला आहे- नियंत्रक आणि महालेखापरीक्षक

Oct 05, 2026