वाहन चोरट्याला अटक; कारसह दोन दुचाकी जप्त

अवधूतवाडी पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने धडक कारवाई करत एका सराईत चोरट्याला अटक केली असून, त्याच्याकडून चोरीच्या तीन गाड्या जप्त केल्या आहेत,

वाहन चोरट्याला अटक; कारसह दोन दुचाकी जप्त

Vehicle Theft​​​​​​​

यवतमाळ (Vehicle Theft) : अवधूतवाडी पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने धडक कारवाई करत एका सराईत चोरट्याला अटक केली असून, त्याच्याकडून चोरीच्या तीन गाड्या जप्त केल्या आहेत, मयंक सुभाष पाईकराव रा. मुलकी यवतमाळ हा संशयित इसम प्रयासवन परिसरात एक चोरीचे वाहन घेऊन विक्रीच्या उद्देशाने फिरत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून मयंकला ताब्यात घेतले.

पोलिसांनी त्याची सखोल चौकशी केली असता, त्याने आपल्या सहकार्‍यांच्या मदतीने शहरातील विविध भागांतून वाहने चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून आर्णी रोड परिसरातील एका चोरीच्या ओम्नी कारचा शोध लागला, तसेच चौकशीदरम्यान त्याने अन्य दोन दुचाकी चोरल्याचेही मान्य केले. पोलिसांनी आरोपीकडून एकूण १ लाख १० हजार रुपये किमतीची तीन वाहने हस्तगत केली. अपर पोलीस अधीक्षक आणि विभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली, पो.नि. नंदकिशोर काळे यांच्या नेतृत्वात पार पडली. या पथकात सहा.पो.नि. श्रीकांत जिंदमवार, पो.उ.नि. सूरज जगताप, एएसआय सुरेश मेश्राम, व इतरांचा समावेश होता.

संबंधित सामग्री

अवैध धंद्यांवर कळमनुरी पोलिसांचा कारवाईचा धडाका; अवैधधंदे चालकांचे धाबे दणाणले

अवैध धंद्यांवर कळमनुरी पोलिसांचा कारवाईचा धडाका; अवैधधंदे चालकांचे धाबे दणाणले

Kalamnuri Police Action: कळमनुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. पोलीस उपाधीक्षक मयूर रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कळमनुरी पोलिसांकडून जुगार अड्डे

Oct 04, 2026
CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJPच्या शिवाजी पार्क आंदोलनात ७५ वर्षीय गोपालकृष्ण पिल्लईंचा हार्ट अटॅकने मृत्यू. अभिजीत दिपकेंविरोधात हत्येच्या गुन्ह्याची मागणी; आयोजकांवरही FIR.

Oct 04, 2026
चोरीस गेलेल्या पिकअपचा हिंगोली ग्रामीण पोलिसांनी लावला शोध;अवघ्या काही तासात आरोपी जेरबंद

चोरीस गेलेल्या पिकअपचा हिंगोली ग्रामीण पोलिसांनी लावला शोध;अवघ्या काही तासात आरोपी जेरबंद

Hingoli Rural Police Action: शहरातील अकोला बायपास परिसरातील दुकानासमोर उभा केलेला सुमारे आठ लाख रुपये किमतीचा महिंद्रा पिकअप चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस

Oct 02, 2026
परभणीत मोटार वायर चोरणारे सहा चोरटे ताब्यात

परभणीत मोटार वायर चोरणारे सहा चोरटे ताब्यात

Daithana Police Action: डफवाडी शिवारातील शेतातून मोटारचे वायर चोरी गेल्याच्या प्रकरणात दैठणा पोलिसांनी तपास करत चोरट्यांना ताब्यात घेतले. वायर वितळवून मिळविलेले दोन किलो तांबे..

Sep 29, 2026
विसर्जन बंदोबस्तानंतर छातीत तीव्र वेदना; नागपूर पोलिस ASIचा उपचारादरम्यान मृत्यू

विसर्जन बंदोबस्तानंतर छातीत तीव्र वेदना; नागपूर पोलिस ASIचा उपचारादरम्यान मृत्यू

गणपती विसर्जनाच्या बंदोबस्तानंतर घरी परतलेल्या नागपूर पोलिस दलातील ASI रवींद्र कोकांडे यांना छातीत तीव्र वेदना झाल्या. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Sep 28, 2026