विघ्नहर्ता चिंतामणी गणपती

विघ्नहर्ता चिंतामणी गणपती बाप्पा समोर शेकडो महिलांनी केले गणपती अथर्वशीर्ष पठण

Vighnaharta Chintamani Ganpati: भक्ती, सेवा आणि संस्कार या त्रिसूत्रीवर कार्य करणाऱ्या स्वयंसिद्धा नारी मंचच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त ऋषीपंचमीचे औचित्य साधून सामूहिक श्री गणपती अथर्वशीर्ष पठण

विघ्नहर्ता चिंतामणी गणपती बाप्पा समोर शेकडो महिलांनी केले गणपती अथर्वशीर्ष पठण

Vighnaharta Chintamani Ganpati

हिंगोली (Vighnaharta Chintamani Ganpati) : भक्ती, सेवा आणि संस्कार या त्रिसूत्रीवर कार्य करणाऱ्या स्वयंसिद्धा नारी मंचच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त ऋषीपंचमीचे औचित्य साधून आज सोमवार दि. १५ सप्टेंबर रोजी सामूहिक श्री गणपती अथर्वशीर्ष पठण सोहळ्याचे भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आले होते.

हिंगोली शहरातील गड्डे पीर गल्ली भागातील प्रसिद्ध श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मंदिरात सकाळी ७ ते ८ या वेळेत हा दिव्य सोहळा पार पडला. यावेळी शहरातील शेकडो महिला भक्तांनी केशरी साडी परिधान करून मोठ्या भक्तिभावाने या पठणात सहभाग घेतला. महिलांच्या एकसुरातील अथर्वशीर्ष पठणाने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला होता.

"एकत्र येऊया, अथर्वशीर्ष पठण करूया आणि श्री गणरायाच्या कृपेने जीवन मंगलमय करूया" या संकल्पनेतून या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ६.४५ वाजताच महिला भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती.

गणपती बाप्पाच्या (Vighnaharta Chintamani Ganpati) जयघोषात आणि वैदिक मंत्रोच्चारात अतिशय मंगलमय वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला. उपस्थित सर्व महिलांना श्री गणरायाचे आशीर्वाद प्राप्त झाले. या कार्यक्रमाचे आयोजन स्वयंसिद्धा नारी मंचच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी यशस्वीरित्या केले.

संबंधित सामग्री

नवसाच्या मोदकातून अनेकांना मिळाला रोजगार 

नवसाच्या मोदकातून अनेकांना मिळाला रोजगार 

Shri Vighnaharta Chintamani Ganpati: शहराचे आराध्य दैवत असलेल्या नवसाला पावणाऱ्या श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीच्या नावाने अनेक कुटुंबांचा चरितार्थ चालतो, याचा प्रत्यय  गणेशोत्सवात पहायला मिळतो.

Sep 24, 2026
हिंगोलीतील 'नवसाला पावणाऱ्या' श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीची महाआरती

हिंगोलीतील 'नवसाला पावणाऱ्या' श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीची महाआरती

Shri Vighnaharta Chintamani Ganpati: हिंगोली शहरातील अत्यंत श्रद्धास्थान असलेल्या 'नवसाला पावणारा श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती'ची भव्य महाआरती मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाली.

Sep 23, 2026
हिंगोलीत 24 व 25 सप्टेंबरला वाहतुकीत बदल; पोलीस अधीक्षकांनी काढले आदेश

हिंगोलीत 24 व 25 सप्टेंबरला वाहतुकीत बदल; पोलीस अधीक्षकांनी काढले आदेश

Shri Vighnaharta Chintamani Ganpati: मुख्य बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये व कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने वाहतुकीत बदल केले आहेत.

Sep 21, 2026
हिंगोलीत विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीची पालखी मिरवणूक उत्साहात

हिंगोलीत विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीची पालखी मिरवणूक उत्साहात

Vighnaharta Chintamani Ganpati: नवसाला पावणारा श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीची पालखी मिरवणूक गणेश चतुर्थीनिमित्त १४ सप्टेंबर सोमवार रोजी मोठ्या उत्साहात काढण्यात आली. टाळ-मृंदगाच्या  गजरात

Sep 14, 2026