Voter List Revision

३५ हजार मतदारांना निवडणूक विभागाची नोटीस; ३० सप्टेंबरपर्यंत सुनावणी

जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांत मध्यंतरी सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आला होता.

३५ हजार मतदारांना निवडणूक विभागाची नोटीस; ३० सप्टेंबरपर्यंत सुनावणी

हिंगोली : जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांत मध्यंतरी सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. या अंतर्गत घरोघरी जाऊन मतदारांचे अर्ज भरून घेण्यात आले. यामध्ये अनेक मतदारांच्या नावांमध्ये विसंगती तसेच नातेवाईकांच्या नावांमध्ये जुळवणी झाली नसल्याचे आढळून आले. त्यामुळे निवडणूक विभागाने तब्बल ३५ हजार मतदारांना नोटीस बजावली आहे.

जिल्ह्यातील हिंगोली, वसमत आणि कळमनुरी विधानसभा मतदारसंघात बीएलओच्या माध्यमातून घरोघरी जाऊन मतदार यादीचा सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. गावपातळीवर मतदारांचे अर्ज भरून घेण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने मतदारांचे सन २००२ च्या मतदार यादीतील माता-पिता तसेच आजी-आजोबा यांच्या नावाची जुळवणी करण्यात आली.

याच प्रक्रियेत कायमस्वरूपी स्थलांतरित झालेले, मॅपिंग न झालेले तसेच मृत झालेले असे जवळपास ८५ हजार मतदार आढळून आले. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेण्यात आला.

दरम्यान, अनेक मतदारांच्या नावासह वडिलांच्या नावात विसंगती आढळून आली आहे. त्यामुळे अशा १८ हजार मतदारांच्या नावांची सुनावणी घेतली जाणार आहे. यासाठी आतापर्यंत एकूण ३५ हजार मतदारांना नोटीस बजावण्यात आली असून, त्यांची सुनावणी ३० सप्टेंबरपर्यंत घेतली जाणार आहे.

नोटीस बजावण्यात आलेल्या मतदारांनी सुनावणीसाठी आवश्यक ती कागदपत्रे उपलब्ध करून ठेवावीत, असे आवाहन निवडणूक विभागाकडून करण्यात आले आहे.

संबंधित सामग्री

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026
ठेकेदाराच्या मनमानीचा फटका; कळमनुरीतील तीन भाग आठ दिवसांपासून तहानलेले!

ठेकेदाराच्या मनमानीचा फटका; कळमनुरीतील तीन भाग आठ दिवसांपासून तहानलेले!

Kalamnuri Municipal Council: डे-नाईट मेडिकलच्या बाजूला पाणीपुरवठ्याची पाईपलाईन संबंधित गुत्तेदाराच्या कामादरम्यान फुटल्याने पठाण गल्ली, माली गल्ली, ताजनगर यासह परिसरातील नागरिकांना मागील आठ दिवस..

Oct 06, 2026
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..

Oct 06, 2026