यशवंत विद्यालय दहावी निकाल

यशवंत विद्यालय वराडा दहावीचा १०० % निकाल

Yashwant Vidyalaya 10th Result: महाराष्ट्रातील यशवंत विद्यालय, वराडा ने दहावीच्या परीक्षेत १००% निकाल घेऊन उत्कृष्टता सिद्ध केली. संजना मोकरकर प्रथम तर आकाश फाये द्वितीय स्थानावर.

यशवंत विद्यालय वराडा दहावीचा १०० % निकाल

Yashwant Vidyalaya 10th Result

 

कु. संजना मोकरकर ७९.२० % प्रथम, आकाश फाये ७६.६०% व्दितीय,
कु. हर्षा नागपुरे  ७४.६०% तृतिय, जानवी मानवटकर ७४% चतृर्थ क्रमांक

कन्हान (Yashwant Vidyalaya 10th Result) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या शालांत परिक्षा इयत्ता दहावी परिक्षेचा निकाल ऑनलाईन जाहिर केला असुन यात यशवंत विद्यालय वराडा चा १०० % निकाल लागला असुन कु. संजना मोकरकर हिने ७९.२० % गुण प्राप्त करून  विद्यालयातुन प्रथम क्रमांक पटकाविला आहे. 
         
यशवंत विद्यालय (Yashwant Vidyalaya 10th Result) वराडा ता. पारशिवनी या माध्यमिक  शाळेतुन एकुण ३३ विद्यार्थ्यानी इयत्ता दहावीची परिक्षा दिली असुन ३३ ही विद्यार्थी उत्तिर्ण झाल्याने या विद्यालयाचा १०० % निकाल लागला आहे. यात डिस्टीक्शन - ०२, ग्रेड १ - २०, ग्रेड २ - ०८, पास ग्रेड ०३ असे एकुण ३३ विद्यार्थी उत्तिर्ण झाले असुन कु. संजना हेमराज मोकरकर हिने ७९.२० % गुण प्राप्त करून यशवंत विद्यालयातुन प्रथम क्रमांक पटकाविला आहे. व्दितीय आकाश जितेंद्र फाये याला ७६.६० %, तृतिय कु. हर्षा अशोक नागपुरे हिला ७४.६० % गुण, चतृर्थ कु. जानवी अंनता मानवटकर हिला ७४ % गुण, पाचवी  कु. पुर्वा ईश्वर टाले हिला ७३. ८० % , सहावी कु पुजा दिवाकर चौधरी हिला ७२ % , सातवी कु. श्रावणी किशोर फलके हिला ७१.४० % , तर  कु.समिक्षा मनोहर दिघडे हिला ७१.२० % गुण प्राप्त करून आठवा क्रमांक पटकावि ल्याने या गुणवंत विद्यार्थ्याना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यशवंत विद्यालय वराडा (Yashwant Vidyalaya 10th Result) या ग्रामिण भागातील माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता १० वी च्या परिक्षेत १०० % निकाल लागल्याने शाळेचे संचालक मा. भुषणराव निंबाळकर सर यानी मुख्याध्यापिका के. बी निंबाळकर, वर्ग शिक्षिका अर्चना शिंगणे व शिक्षक राजेंद्र गभणे, राकेश गणविर, सतिश कुथे, मोतीराम रहाटे, दिपक पांडे तसेच सर्व उत्तिर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचाली स शुभेच्छा दिल्या आहे. 

संबंधित सामग्री

कामगार कल्याण मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त कन्हानमध्ये वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश

कामगार कल्याण मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त कन्हानमध्ये वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश

Labor Welfare Board: कामगार कल्याण मंडळाच्या सादर कार्यक्रमात कन्हान येथे पोलिस स्टेशन आणि पशुवैद्यकीय दवाखान्याच्या परिसरात वृक्षांना उभारण्यात आले. महत्त्वाचे व्यावहारिक संदेश

Jul 03, 2026
श्री. जागेश्वर विद्यालय वाडेगावच्याच्या कु. श्वेता काळे 93.40 टक्के गुणांनी टॉपर

श्री. जागेश्वर विद्यालय वाडेगावच्याच्या कु. श्वेता काळे 93.40 टक्के गुणांनी टॉपर

Topper Shweta Kale: वाडेगावच्या श्री. जागेश्वर विद्यालयातील कु. श्वेता काळे यांनी 93.40% गुण मिळवून प्रथम स्थान प्राप्त केले. त्यांच्या यशाचे श्रेय त्यांच्या शिक्षकांना व कुटुंबीयांना जाते.

May 09, 2026
सुखदेवानंद विद्यालय भांडेगावची उज्वल निकालाची परंपरा कायम

सुखदेवानंद विद्यालय भांडेगावची उज्वल निकालाची परंपरा कायम

Sukhdevananda Vidyalaya: हिंगोलीतील सुखदेवानंद विद्यालयातील विद्यार्थ्यांनी एसएससी परीक्षेत 94.91% निकाल साध्य केला. शाळेतून 38 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह उत्तीर्णता मिळवली.

May 08, 2026
ज्ञानेश्वर विद्यालय मांडवा यांचा SSC परीक्षेत उत्कृष्ट निकाल

ज्ञानेश्वर विद्यालय मांडवा यांचा SSC परीक्षेत उत्कृष्ट निकाल

10th Exam Result: ज्ञानेश्वर विद्यालय, मांडवा यांनी एस.एस.सी. परीक्षेत 98.91% यशस्वी निकाल नोंदवला. 186 मुलांपैकी 183 मुले पास झाली, दयासागर गंगाधर चिंचणे 94.80% गुणांसह प्रथम आला.

May 08, 2026
भावना पब्लिक स्कूलचा दहावी CBSE परीक्षेत १००% निकाल 

भावना पब्लिक स्कूलचा दहावी CBSE परीक्षेत १००% निकाल 

शाळेने प्रत्येक वर्षी गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडवून समाजासाठी डॉक्टर, इंजिनिअर व जबाबदार नागरिक तयार केले आहेत.

Apr 18, 2026