गोदावरी नदी युवक मृत्यू

परभणीतील गोदावरी नदी पात्रात बुडून युवकाचा मृत्यू....!

Godavari River Youth Death: गुरुवारी सकाळी गंगाखेडत झालेल्या घटनेत २० वर्षाचा धनगर गल्लीचा युवक पाण्यात बुडून मृत्यू होण्याची शक्यता तपासली जात आहे. त्याच्या आईने आरडावे आले

परभणीतील गोदावरी नदी पात्रात बुडून युवकाचा मृत्यू....!

Godavari River Youth Death

 

गंगाखेड शहराजवळील घटना; अकस्मात मृत्यूची नोंद...!

परभणी (Godavari River Youth Death) :  गंगाखेड येथे धारखेड पुलाखाली गोदावरी नदी पात्रात बुडून एका २० वर्षीय युवकाचा मृत्यु झाला. ही घटना गुरुवार १८ जून रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास उघडकीस आली असुन गंगाखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

शहरातील धनगर गल्ली येथील राधाजी बळीराम शिंदे वय २० वर्ष हा युवक गुरुवार १८ जून रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास त्याच्या आईसोबत कपडे धुण्यासाठी गोदावरी नदीवर गेला होता. येथे असलेल्या नगर परिषदेच्या पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीजवळ पोहत असतांना हा (Godavari River Youth Death) युवक पाण्यात बुडत असल्याचे पाहून त्याच्या आईने आरडाओरडा केला. हा आरडाओरडा ऐकून हबीब बेग, रमेश भोई आदींसह बहुसंख्य पोहणार्‍या तरुणांनी नदी पात्रात उडी घेत शोध सुरु केला. तब्बल दिड तासानंतर सकाळी ९ वाजेच्या सुमारास त्यास पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले.

गोदावरी नदी पात्रात एक युवक बुडाल्याची माहिती समजताच पोलीस उपनिरीक्षक युसूफ खान पठाण, पोह संतोष व्यवहारे यांनी ही घटनास्थळी धाव घेत त्यास खाजगी रुग्णवाहिका चालक रावण भालेराव व हनुमान इंगळे यांच्या मदतीने गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी उद्धव शिंदे यांनी दिलेल्या माहितीवरून (Godavari River Youth Death) अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. याचा पुढील तपास पोह संतोष व्यवहारे, पो.शि. राम पडघन हे करीत आहेत.

संबंधित सामग्री

वसमतमध्ये तलावाच्या उघड्या खड्ड्यात पडून बालकाचा मृत्यू

वसमतमध्ये तलावाच्या उघड्या खड्ड्यात पडून बालकाचा मृत्यू

Vasmat Child Death: वसमत येथील मोठ्या तळ्याच्या खोलीकरणाच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एका आठ वर्षे बालकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणाने हळहळ व्यक्त होत आहे.

Aug 10, 2026
बैलजोडी धुण्यास गेलेल्या दोन युवकांचा नदी पात्रात बुडून मृत्यू

बैलजोडी धुण्यास गेलेल्या दोन युवकांचा नदी पात्रात बुडून मृत्यू

Ghota Devi Youth Death: देवी शिवारातील गावातील दोन युवकांनी कयाधू नदीच्या पात्रात बेलजोडी धुण्याने दुरलगावले. नदीत रेताचा उत्खननामुळे खड्ड्यात साचलेल्या गाळामुळे त्यांना मृत्यू झाला.

Jul 13, 2026
परभणीत विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू...!

परभणीत विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू...!

Parbhani Child Death: सोनपेठ येथील जुन्या मारोती मंदिराजवळ असलेल्या विहीरीत गेलेल्या रमण गौतम कांबळे याने पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडून मृत्यू झाला.

Jun 15, 2026
अडाण नदीत बुडून आतेभाऊ-मामेभाऊ या दोन युवकांचा दुर्दैवी अंत!  

अडाण नदीत बुडून आतेभाऊ-मामेभाऊ या दोन युवकांचा दुर्दैवी अंत!  

River Drowning Death: गोमुखेश्वर सन्स्थान जवळील अडाण नदीत स्नानासाठी गेलेले दोन तरुण, शुभम धोंडे (१४) आणि दर्शन वावगे (२०), पोहण्यात बुडून मृत झाले. दुःखी कुटुंबांना अनेक कष्टे येत आहेत.

Jun 14, 2026
शेततळ्यात बुडून सख्ख्या भाऊ-बहिणीचा मृत्यू; दक्षिण सोलापुरात हळहळ

शेततळ्यात बुडून सख्ख्या भाऊ-बहिणीचा मृत्यू; दक्षिण सोलापुरात हळहळ

दक्षिण सोलापूर तालुक्यातील कारकल परिसरात घडलेल्या एका अत्यंत दुर्दैवी घटनेत शेततळ्यात बुडून सख्ख्या भाऊ-बहिणीचा मृत्यू झाला आहे.

Apr 13, 2026