जिल्ह्याची मुख्य धुरा स्थानिक गुन्हे शाखेकडे!
हिंगोली (Appointment) : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील हे 31 जुलैला सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या रिक्त जागेवर कळमनुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मोहन भोसले यांच्या नियुक्तीचे आदेश जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी काढले आहेत.
जिल्ह्याची मुख्य धुरा स्थानिक गुन्हे शाखेकडे असते. त्यामुळे या ठिकाणी कोणाची वर्णी लागते, याकडे सर्वांचेच नेहमी लक्ष लागलेले असते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील हे 31 जुलैला सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या रिक्त जागेवर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना 30 जुलैला जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे (District Superintendent of Police Shrikrishna Kokate) यांनी काढलेल्या आदेशात कळमनुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मोहन बाळासाहेब भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी हा पदभार स्विकारला. तसेच कळमनुरी पोलिस ठाण्याच्या (Kalamanuri Police Station) पोलिस निरीक्षकपदी प्रेमप्रकाश माकोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक भोसले यांचे यापूर्वी उल्लेखनीय कामगिरी!
स्थानिक गुन्हे शाखेचे नूतन पोलीस निरीक्षक मोहन भोसले (Police Inspector Mohan Bhosale) यांनी यापूर्वी नांदेड जिल्ह्यात पोलीस स्टेशन शिवाजीनगर, पोलीस स्टेशन उमरी तसेच नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयात दरोडा प्रतिबंधक पथक येथे आणि हिंगोली जिल्ह्यातील रुजू झाल्यानंतर, कळमनुरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी उत्कृष्ट काम बजावले आहे. या ठिकाणची उल्लेखनीय कामगिरी लक्षात घेता आता त्यांच्याकडे स्थानिक गुन्हे शाखेची (Local Crime Branch) धुरा सोपविण्यात आलेली आहे.