जनतेच्या आरोग्याला धोका; जनतेत संतापाची लाट
बार्शीटाकळी (Electricity Department) : बार्शीटाकळी व तालुक्यातील अनेक गावात वारंवार वीज पुरवठा बंद राहत असल्याने जनतेचे कमालीचे हाल होत असून वीज वितरण कंपनीच्या (Electricity Department) मनमानी व हुकूमशाही कारभाराला बार्शीटाकळी तालुक्यातील गावागावातील जनता कमालीची वैतागलेली आहे.
सद्यस्थितीला सतत पाऊस चालू असून, जिकडेतिकडे पाणीच पाणी साचलेले आहे, अशातच बार्शीटाकळी दगड पारवा व तालुक्यातील अनेक गावात दिवसा व रात्रीला दिल्या सात-आठ दिवसापासून वारंवार (Electricity Department) वीज पुरवठा खंडित तथा बंद राहत असल्याने घरातील हवेची उपकरणे पंखे बंद राहत असल्याने तसेच सर्वत्र अंधाराचे साम्राज्य निर्माण होत असल्याने जनतेला कमालीचा त्रास होत असून डासांचा मोठ्या प्रमाणात प्रभाव असल्याने जनतेच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असून विविध प्रकारच्या आजाराची निर्मिती होत असल्याने अनेक दवाखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढत असल्याने वीज वितरण कंपनीच्या मनमानी व हुकूमशाही कारभारामुळे जनतेच्या आरोग्यास धोका निर्माण झाल्याची विदारक परिस्थिती आहे.
अनेक तास वीज पुरवठा बंद ठेवणे हे शासकीय आदेश व नियमांचे उल्लंघन करणारे ठरत असून जनता दरमहा कोट्यावधी रुपये वीज मंडळाला बिल भरण्याच्या नावाने देत आहेत. दोन-तीन महिन्याचे विज बिल थकीत असले तरी विद्युत वितरण कंपनीतील जबाबदार व मुजोर कर्मचारी जनतेचा वीजपुरवठा खंडित करत आहेत. त्यामुळे गावातील जनतेत वीज वितरण कंपनीच्या विरोधात समतापाची लाट निर्माण झाली आहे.
बार्शीटाकळी तालुक्यातील जबाबदार वीज कार्यालयातील उप अभियंता, सहायक अभियंता व विद्युत वितरण कंपनीचे जबाबदार अधिकारी व कर्मचारी वारंवार वीजपुरवठा खंडित असल्यावरही वीस चालू करण्यास टाळाटाळ करत असलेल्या अनेक प्रकारच्या चर्चा खुलेआम होत आहेत. तालुक्यातील अनेक गावातील जनता (Electricity Department) वीज वितरण कंपनीच्या जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मनमानी व हुकूमशाही कारभाराला कंटाळलेली असल्याची विदारक परिस्थिती बार्शीटाकळीसह तालुक्यातील अनेक गावात निर्माण झाली आहे.
निवडणुकीच्या काळात जनतेच्या हिताचा डांगोरा पिणाऱ्या विविध पक्षाच्या लोकप्रतिनिधीला वारंवार वीज पुरवठा खंडित राहतो याची जाणीव असल्यामुळे ते (Electricity Department) वीज वितरण विभागातील जबाबदार कर्मचाऱ्यांची कान उघडणी का करत नाहीत हाच खरा प्रश्न निर्माण झाला आहे.