अजितदादांच्या पक्षाला नॉट रिचेबल जिल्हाध्यक्ष!
लातूर (Ajit Pawar) : दोन आमदार भाग्याला आलेल्या अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीला लातूर जिल्ह्यात पदाधिकारीच भारी ठरत आहेत. प्रत्येक पदाधिकाऱ्याची वेगळी तऱ्हा, जिल्ह्यातल्या मंत्र्याचा रुबाब न्यारा आणि जिल्ह्यातील दादांचे कार्यकर्ते मात्र बेसहारा, अशी परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे. त्यातून पक्षाचा जिल्हाध्यक्ष ‘पर्मनंट’ ‘नॉट रिचेबल’ असल्याने पक्षात ‘बाबा बोलेना अन् दादा चालेना…,’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्यात भाजपाला यश आल्यानंतर अजित पवार सत्तेत गेले आणि शरद पवार विरोधात गेले. या पक्षांमध्ये फूट पडली. ज्यांना सत्ता प्रिय आहे असे पदाधिकारी अजितदादांच्या पाठीमागे गेले आणि ज्यांना पवार साहेबांवर निष्ठा आहे ते शरद पवारांच्या पाठीशी राहिले. लातूर जिल्ह्यात हे चित्र मात्र वेगळे आहे. यात कुणी अजित पवारांचे आहे, कुणी छगन भुजबळांचे आहे, कुणी तटकरेंचे तर दुसऱ्या बाजूला कुणी शरद पवारांचे, कुणी सुप्रियाताईंचे, कुणी रोहित दादांचे तर कुणी जयंत पाटलांचे समर्थक आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पदाधिकाऱ्यांचा मेळा आहे. मात्र या पदाधिकाऱ्यांच्या मागे कार्यकर्तेच दिसत नाहीत. त्यामुळे व्यासपीठावरील गर्दी मोठी असली तरी पक्षाला सावरणारे दर्दी मात्र दिसूनच येत नाहीत. त्यातून पक्षाने ज्यांना जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली, ते सतत ‘नॉट रिचेबल’, असतात. औसा शहराच्या गल्लीबोळा पलिकडे या जिल्हाध्यक्षाची झेप नसल्याने जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी कुणाकडे पाहायचे? कुणाकडे जायचे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यात मंत्री पद असले तरी ते अहमदपूरच्या पलिकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला पाहत नाही आणि उदगीरचे आमदार उदगीरच्या पलिकडे जाण्याचे धाडस करत नाहीत. त्यामुळे जिल्ह्यात ‘बाबा बोलेना अन् दादा (पक्ष) चालेना…’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
अजित पवार व अफसर शेख




