संघर्ष समितीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
बाभूळगाव (Babhulgaon Nagar Panchayat) : नगर पंचायत मुख्याधिकारी डॉ. पल्लवी सोटे व येथील सत्ताधारी नगरसेवकांच्या विरोधात झालेल्या उपोषण आंदोलनाचे वेळी चौकशी समिती गठीत करण्यात आली. मात्र त्यानंतर झालेल्या चौकशिंचा कुठलाही अहवाल तक्रारदार, उपोषणकर्ते अथवा संघर्ष समिती यांना देण्यात आला नाही. त्यामुळे मुख्याधिका-यासह इतररांच्या चौकशीचा प्रशासनाकडून निव्वळ टाईमपास होत असल्याचा आरोप संघर्ष समिती केला आहे. या (Babhulgaon Nagar Panchayat) प्रकरणी करण्यात आलेल्या चौकशीचा अहवाल देण्यात यावा अशी मागणी अर्जाद्वारे जिल्हाधिकारी यांना दि. ०२ सप्टेंबर रोजी करण्यात आली.
नगर पंचायत (Babhulgaon Nagar Panchayat) मुख्याधिकारी व येथील स्थायी समिती यांच्यावर भ्रष्टाचाराचे व हितसंबंधीतांना लाभ पोहचविण्याचे आरोप करण्यात आले होते. दोन महिन्यांआधी या विरोधात नगरसेवक चंद्रशेखर परचाके, अभय तातेड यांनी संघर्ष समितीच्या सहकार्याने तीव्र आंदोलन करीत उपोषणाचा मार्ग अवलंबला होता. त्यावेळी ना.डॉ. अशोक उईके यांनी जिल्हाधिकारी यांचेशी उपोषणकर्त्यांची फोनवर चर्चा घडवून उपोषण सोडविले. त्यानंतर लगेच प्रकणाच्या चौकशीसाठी अप्पर जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली चौकशी समितीचे गठन करण्यात आले. अप्पर जिल्हाधिकारीयांचे दालनात १५ जुलै रोजी चौकशी समितीसमोर सुनावणी सुद्धा झाली आहे. व त्यानंतर सदर समितीने या प्रकरणांची वारंवार तपासणी केलेली आहे.
परंतु सदर चौकशी संदर्भातील अहवाल अद्याप पर्यंत तक्रारदार किंवा संघर्ष समितीला देण्यात आला नाही. त्यामुळे या प्रकरणी काय कार्यवाही करण्यात आली, मुख्याधिकारी व न.पं. सत्ताधारी पदाधिकारी यांना राजकीय पाठबळ मिळत आहे काय? तसेच चौकशी समितीवर राजकीय दबावामुळे सदर मुख्याधिकारी यांना वाचविण्याकरीता राजकीय दबाब आणला जात आहे काय? या (Babhulgaon Nagar Panchayat) प्रकारच्या आता शहरवासियांमध्ये चर्चा होत आहेत. आता पर्यंत केलेल्या चौकशीचा अहवाल लेखी स्वरूपात तक्रारदार, उपोषणकर्ते, संघर्ष समिती यांना यावा, अशी मागणी अर्जाद्वारे जिल्हाधिकारी यांना करण्यात आली आहे.
या अर्जावर नगरसेवक चंद्रशेखर परचाके, अभय तातेड, अनिकेत पोहोकार, आरीफ अली, अर्जुन गुप्ता, सचिन लांजेकर, प्रविण लांजेकर, प्रफुल खोडे, छगन काळे, ओमप्रकाश गुप्ता, शशीकांत थोटे, राजु नवाडे, आशिष दौलतकार, राजु फसाटे, मो. जोवदखान, अजमत मुल्ला , पप्पु तातेड, भारत भुराणे, विक्रम ब-हाणपुरे, मिलींद नवाडे, अरूणा बद्दर, दिनेश कांडलकर, रविंद्र काळे, अ.जावेद अ. रहिम, श्रीकृष्ण ढाले आदि संघर्ष समिती सदस्यांच्या स्वाक्षरी आहेत.