मानोरा (Bachu Kadu) : माजी मंत्री बच्चू कडू व शेतकरी नेता प्रकाश भाऊ पोहरे यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी नागपूर येथे केलेल्या आंदोलनाला मानोरा तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा जाहीर पाठिंबा असल्याचे निवेदन तहसीलदार डॉ संतोष यावलीकर यांना दि. ३० ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांनी (Farmers) दिले आहे.
दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, प्रहार चे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू व लोकनेता प्रकाश भाऊ पवार यांनी माहिती सरकारने निवडणूक दरम्यान दिलेले सातबारा कोरा आश्वासन पूर्ण करावे, अतिवृष्टीने दुष्काळात सापडलेल्या शेतमजूर, शेतकरी, संत्रा व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना माहिती सरकारने भरी मदत द्यावी, या मागणीसाठी वेळोवेळी सुरू असलेल्या आंदोलनाला मानोरा तालुक्यातील शेतमजूर शेतकऱ्यांचा जाहीर पाठिंबा असल्याचे निवेदन शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना दिले आहे. निवेदन देतेवेळी शेतकरी विशाल ठाकरे, सुनील देशमुख कोडोलीकर, प्रदीप मिसाळ, गणेश कोल्हे, सुधाकर चौधरी, गुलाब पवार, गजानन गोरले, बाबाराव डेरे, योगेश देशमुख देवनाथ भोयर, विनोद ठाकरे, भीमराव खडसे आदी उपस्थित होते.
