आ. बांगर यांच्या प्रतिष्ठेची तर विरोधकांच्या अस्तित्वाची लढाई
हिंगोली (Krushi Bazar Samiti) : आखाडा बाळापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालकांच्या निवडीसाठी उद्या ३० ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. या निवडणूकीत एक विरूध्द सारे असे चित्र तयार झाल्यामुळे ही (Krushi Bazar Samiti) निवडणूक एकीकडे (MLA Santosh Bangar) आ. संतोष बांगर यांच्यासाठी प्रतिष्ठेची तर विरोधकांसाठी अस्तित्वाची लढाई बनली आहे.
शिवसेना – काँग्रेस – शिवसेना (शिंदे गट) असा राजकीय प्रवास केलेल्या संतोष बोंढारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढविली जात असल्याने त्यांना आ. संतोष बांगर व आ. राजू पाटील नवघरे यांचे पाठबळ आहे. सात वर्षापूर्वी झालेल्या निवडणूकीत बोंढारे यांच्या पॅनलने वर्चस्व मिळविले होते. दत्ता संजय बोंढारे हे मावळत्या सभागृहात सभापती होते. शिवसेना शिंदे गटाचे असलेल्या बोंढारे पिता पुत्रांसोबत (MLA Santosh Bangar) आ. संतोष बांगर यांची शक्ती आहे.
वसमतचे आमदार राजू पाटील नवघरे हे सुध्दा महायुती म्हणुन त्यांच्या सोबत आहेत. सत्ताधारी महायुतीचे महत्वाचे घटक असलेल्या भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार गजानन घुगे हे मात्र या (Krushi Bazar Samiti) निवडणूकीत महाविकास आघाडीच्या पॅनल सोबत आहेत. माजी खासदार शिवाजी माने, माजी आमदार संतोष टारफे, शिवसेना जिल्हा प्रमुख अजय सावंत, बाळासाहेब मगर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, काँग्रेसचे नेते झिया कुरैशी, माजी सभापती नागोराव करंडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष गणाजी बेले, अॅड. रवि शिंदे, डॉ. अरूण सुर्यवंशी अशा अनेक मातब्बर नेत्यांनी आ. संतोष बांगर यांच्या पुढे आव्हान उभे केले आहे.
या (Krushi Bazar Samiti) निवडणूकीच्या तयारीसाठी माजी खासदार शिवाजी माने पुढाकार घेऊन सुरूवातीला बैठकही बोलावली होती. पुढे लंडनला निघून गेल्याने राजकीय गोटात विविध चर्चा सुरू झाल्या. अशातच सरपंच संघटनेनेही ९ सदस्यांचे एक पॅनल रिंगणात उतरविले. या पॅनलचे उमेदवार कोणाला विजय मिळवून देतील याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. आ. संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांच्या आईला उपचारासाठी मुंबईला हलविण्यात आल्याने या निवडणुकीची धुरा त्यांचे बंधू श्रीराम बांगर यांनी सांभाळली आहे.
आ. संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांच्यासाठी प्रतिष्ठेची समजली जाणारी ही (Krushi Bazar Samiti) निवडणूक विरोधकाच्या अस्तित्वाची बनली आहे. एक विरूध्द सगळे असे चित्र या निवडणूकीच्या निमित्ताने उभे झाल्याने निकालाकडे सबंध जिल्ह्याचे लक्ष राहणार आहे.