कुरुंदा (Dhangar Samaj) : धनगर समाजास अनुसुचित जमातीत (S T) प्रवर्गातून आरक्षणाच्या अमलबजावणीसाठी पाठिंबासह शासनाकडे पाठपुरावा करणे बाबब धनगर समाज तालुका वसमत कुरूंदाच्या वतीने (MP Nagesh Patil Ashtikar) खा. नागेश पाटील आष्टीकर यांना निवेदन देण्यात आले.
धनगर समाज (Dhangar Samaj) हा मागास असून समाजास अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गातून घटनावत आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी, ही समाजाची मागील 75 वर्षापासूनची मागणी आहे. त्या अनुषंगाने समाज बांधवांनी वेळोवेळी आंदोलन केलेली आहेत. देखील समाजास अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी समाज बांधव मल्हार योद्धा दीपक बोराडे हे नियोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक अंबड चौफुली येथे 17 सप्टेंबर पासून उपोषणास बसले आहेत व उपोषणाचा आज तेरावा दिवस आहे. त्यांच्या उपोषणास महाराष्ट्रातील अनेक सामाजिक संघटनांनी पाठिंबा दर्शवून धनगर समाजास अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी ची मागणी केली आहे.
आपण हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी असून (Dhangar Samaj) समाजाच्या सदरच्या न्याय मागणीसाठी आपण पाठिंबा दर्शवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून समाजाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कुरुंदा येथे सकल धनगर समाजाच्या वतीने आज खासदार अष्टीकर (MP Nagesh Patil Ashtikar) यांना कुरुंदा येथील धनगर समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी समाज बांधव उपस्थित होते.