बुलढाणा (Azim Nawaz Rahi) : जिल्ह्याच्या काव्य क्षेत्रातील नामांकित असणाऱ्या व ज्यांना महाराष्ट्राची शब्ददौलत संबोधल्या जाते, अशा (Azim Nawaz Rahi) अजीम नवाज राही यांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्यावतीने भा. रा. तांबे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
सोमवार २६ मे रोजी पुणे येथे महाराष्ट्र साहित्य परिषदतर्फे मराठी काव्यक्षेत्रातल्या वस्तुनिष्ठ, प्रयोगशील योगदानाबद्दल दिला जाणारा भा. रा. तांबे पुरस्कार अजीम नवाज राही यांना एस. एम. जोशी सभागृहात प्रसिद्ध हिंदी लेखिका सविता सिंग यांच्याहस्ते व परिषदेचे अध्यक्ष प्रसिद्ध विचारवंत रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यवाह प्रसिद्ध कवयत्री अंजलीताई कुळकर्णी, कोषाध्यक्ष मिलींद कुळकर्णी, प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार आणि कार्याध्यक्ष मिलींद जोशी यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. हे सगळे कवितेचे आभाळव्यापी उपकार असल्याच्या भावना, यावेळी (Azim Nawaz Rahi) राही यांनी व्यक्त केल्या.