माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयात दिले निवेदन
हिंगोली (Hingoli wet drought) : जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकर्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. या गंभीर परिस्थितीकडे तातडीने लक्ष वेधण्यासाठी आणि ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी २९ सप्टेंबर सोमवार रोजी माजी आ. भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर भजन दिंडीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.
माजी आ. भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या निवासस्थाना वरून निघालेल्या या मोर्चामध्ये शेकडो महिला-पुरुषांनी सहभाग घेतला. हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक, जवाहर रोड, महात्मा गांधी चौक, इंदिरा गांधी चौक, नांदेड नाका मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. या मोर्चामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भैय्या देशमुख, कांतराव हराळ, भास्कर बेंगाळ, गजानन पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात माजी आ.पाटील यांनी निवेदन दिले. ज्यामध्ये ओला दुष्काळ तातडीने जाहीर करावा: जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये त्वरित ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्यात यावा,जिल्ह्यातील सर्व शेतकर्यांचे थकीत कर्ज सरसकट माफ करण्यात यावे, या आंदोलनात कांतराव हराळ, भास्कराव बेंगाळ,भैय्या देशमुख,मदन पाटील, दाजीबा पाटील,मदन शेळके, बालाजी गावंडे , नामदेवराव पवार, अशोक चव्हाण, शिवाजी जगताप आदी सहभागी झाले होते.