आ. नरेंद्र भोंडेकर यांचे न.प. मुख्याधिकार्यांना निर्देश
भंडारा (Bhandara Nagar Parishad) : नगर परिषद क्षेत्र अंतर्गतच्या एकूण १६,४०० घरांचे सर्व्हे करण्यात येणार असून या हा सर्व्हे तब्बल ११२ वर्षानंतर करण्यात येणार आहे. या (City survey) सर्व्हे करिता लागणारा अंदाजित खर्च तीन कोटी ४० लक्ष इतका असून नगर परिषद भंडाराद्वारे तत्काळ एक कोटी रुपये भरून सर्व्हे सुरु करण्याचे निर्देश आज आ. नरेंद्रे भोंडेकर (MLA Narendra Bhondekar) यांनी दिले. आज भंडारा नगर परिषद येथे आ. भोंडेकर यांच्याद्वारे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ज्या दरम्यान त्यांनी तत्काळ सर्व्हे सुरु करण्याचे निर्देश दिले.
उल्लेखनीय आहे की, भंडारा नगर परिषदेच्या (Bhandara Nagar Parishad) क्षेत्रांतर्गत १९१२ साली सर्व्हे करण्यात आला होता. इंग्रज काळात झालेल्या सर्व्हेनंतर या क्षेत्राचे सर्व्हे न झाल्यामुळे नगर परिषद क्षेत्रांतर्गत १६,४०० परिवार नगर परिषदेच्या हद्दी बाहेरच आहेत. ज्यामुळे आजही वरील सर्व निवासी हे अतिक्रमणधारक म्हणविले जात आहे. अशात आज आ. नरेंद्र भोंडेकर यांच्याद्वारे विविध विषयांवर आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत या विषयावर गांभीर्याने चर्चा करण्यात आली. ज्यात वरील माहिती समोर आली.
नगर परिषद मुख्याधिकारी यांनी माहिती देताना सांगितले की (Bhandara Nagar Parishad) भंडारा नगर परिषद हद्देतील पिंगलाई येथील ३२००, गणेशपूर चे ५०००, केसलवाडा चे १२०० व भंडारा खास येथील ७००० असे एकूण १६,४०० घरांचे सिटी सर्व्हे होऊ शकले नाही. ज्या करिता लागणारा निधी हा कमी पडत आहे. अशात आ. नरेंद्र भोंडेकर (MLA Narendra Bhondekar) यांनी या कामाकरिता लागणारे तीन कोटी ४० लक्ष पैकी एक कोटी रुपये नगर परिषदेच्या निधीतून भरण्याचे निर्देश देत सिटी सर्व्हे तत्काळ सुरु करण्यास सांगितले.
सोबतच उरलेला दोन कोटी ४० लक्ष रुपयांचा निधी हा वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून भरण्याकरिता प्रस्ताव सादर करण्यास सांगितले. या (City survey) सर्व्हेनंतर जे परिवार गेल्या अनेक वर्षांपासून नझुलच्या जागेवर अतिक्रण करून बसले आहेत, त्यांचा मार्ग मोकळा होऊन त्यांना त्या जागेचा मालिकांना हक्क मिळू शकेल. इतकेच नाही तर कित्येक परिवारांना घरकुल योजनेचा लाभ सुद्धा मिळू शकेल.
सदर बैठकीत शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल गायधने, लोकसभा संपर्क प्रमुख संजय कुंभलकर, मागास वर्गीय सेनाचे जिल्हा प्रमुख दीपक गजभिये, शहर प्रमुख राजेश चोपकर, माजी नगर सेवक नितीन धकाते, बंटी मिश्रा सह सर्व पदाधिकारी व विभाग प्रमुख उपस्थित होते.