जाणून घ्या…काय सुरु, काय बंद राहणार?
नवी दिल्ली (Bharat Bandh) : कामगार संघटनांनी पुकारलेल्या भारत 10 केंद्रीय कामगार संघटना (Central Trade Union) आणि त्यांच्या सहयोगी युनिट्सनी या संपाची हाक दिली आहे. दुसरीकडे, केरळ भाजपचे अध्यक्ष राजीव चंद्रशेखर म्हणाले की, हा भारत बंद (Bharat Bandh) नाही आणि त्याला सर्व संघटनांकडून पाठिंबा मिळालेला नाही. हा सीपीआय (एम) समर्थित संप आहे.
संघटनांचे (Central Trade Union) म्हणणे आहे की, सरकारच्या कामगारविरोधी, शेतकरीविरोधी आणि देशविरोधी धोरणांच्या निषेधार्थ देशव्यापी संप (Bharat Bandh) करण्यात येत आहे. त्याचा सर्व क्षेत्रातील अत्यावश्यक सेवांवर परिणाम होऊ शकतो. बँकिंग, विमा, रेल्वे आणि इतर क्षेत्रांवर त्याचा कसा परिणाम होईल ते जाणून घेऊया.
या संघटनांनी संपाला पाठिंबा
हिंद मजदूर सभेचे हरभजन सिंह सिद्धू म्हणाले की, भारत बंदचा परिणाम संपूर्ण देशावर होऊ शकतो. या (Bharat Bandh) संपामुळे बँकिंग, टपाल सेवा, कोळसा खाणकाम, राज्य वाहतूक, कारखाने आणि इतर आवश्यक सेवांवर परिणाम होऊ शकतो.
ऑल इंडिया ट्रेड युनियन (Central Trade Union) काँग्रेसच्या अमरजीत कौर म्हणाल्या की, आतापर्यंत अनेक मोठ्या शेतकरी आणि कामगार संघटनांनी संप प्रभावी करण्यासाठी पाठिंबा दिला आहे. देशातील विविध भागात शेतकरी आणि ग्रामीण कामगारांनीही संपाला पाठिंबा जाहीर केला आहे. एनएमडीसी लिमिटेड, इतर खनिजे, स्टील कंपन्या, राज्य सरकारी विभाग आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे कर्मचारीही संपात (Bharat Bandh) सामील होण्याची पुष्टी केली आहे. प्रमुख शेतकरी संघटना संयुक्त किसान मोर्चा आणि कृषी श्रमिक संघटना देखील यात सामील होत आहेत. यापूर्वी 16 फेब्रुवारी 2024 रोजी शेवटचा देशव्यापी संप पुकारण्यात आला होता.
कामगार संघटनांनी सरकारला 17 कलमी मागण्यांचे निवेदन
कामगार संघटनांच्या मंचाने (Central Trade Union) सांगितले की, त्यांनी गेल्या वर्षी कामगार मंत्र्यांना 17 कलमी मागण्यांचे निवेदन सादर केले होते. त्यांच्या मुख्य तक्रारी आहेत.
- गेल्या 10 वर्षांपासून सरकार वार्षिक कामगार परिषद आयोजित
- चार नवीन कामगार संहिता लागू करून, सरकार कामगारांचे हक्क कमकुवत
- सामूहिक सौदेबाजी, संपाचा अधिकार आणि (Central Trade Union) कामगार कायद्याच्या उल्लंघनाचे गुन्हेगारीकरण यासारख्या धोरणे कामगारांसाठी विनाशकारी
- नोकऱ्यांचा अभाव, महागाई आणि घटत्या वेतनासारख्या समस्यात वाढ