हिंगोली (Bharat Ratna Nanaji Deshmukh) : हिंगोलीचे भूमिपुत्र भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या १५ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम तसेच क्रिस्प संचालित भारतरत्न नानाजी देशमुख (Bharat Ratna Nanaji Deshmukh) कौशल्य विकास व उद्योजकता केंद्राच्या वर्षपूर्ती सोहळ्याचे भव्य आयोजन शिवाजी सभागृह, हिंगोली येथे करण्यात आले. कार्यक्रमास हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल, क्रिस्पचे एमडी व चेअरमन डॉ. श्रीकांत पाटील, संजय कौडगे, माजी आमदार गजानन घुगे, तसेच फुलाजी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न नानाजी देशमुख (Bharat Ratna Nanaji Deshmukh) यांच्या जीवनावर आधारित विशेष चित्रफीत आणि क्रिस्पच्या कार्यप्रवासावरील व्हिडिओ प्रस्तुतीकरणाने करण्यात आली. यानंतर फुलाजी शिंदे यांनी नानाजींच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला, तर गजानन घुगे यांनी नानाजींच्या सामाजिक कार्याचा विस्तृत आढावा घेतला. संजय कौडगे यांनी क्रिस्प आणि डॉ. श्रीकांत पाटील यांच्या कार्याचे कौतुक करत संस्थेच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच, विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त कौशल्य विकास उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
क्रिस्पचे व्यवस्थापकीय संचालित डॉ. श्रीकांत पाटील यांनी नानाजी देशमुख यांच्या कार्यातून मिळालेल्या प्रेरणेचा उल्लेख करत, हिंगोलीतील युवकांसाठी क्रिस्पच्या माध्यमातून आगामी काळात हजारो विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्याचा संकल्प व्यक्त केला. हिंगोलीतील हजारहून अधिक प्रशिक्षणार्थींमध्ये निवडक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे आणि कौशल्य विकास किटचे वाटप करण्यात आले.
हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी क्रिस्प आणि डॉ. श्रीकांत पाटील यांच्या कार्याची प्रशंसा करत, हिंगोलीसारख्या शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे कौशल्य विकास केंद्र असणे अभिमानास्पद आहे असे नमूद केले. तसेच, भारतरत्न नानाजी देशमुख कौशल्य विकास व उद्योजकता केंद्रासोबत प्रशासनाचे सहकार्य राहील आणि भविष्यात विविध प्रकल्पांवर एकत्रित काम करण्याचा मानस आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. (Bharat Ratna Nanaji Deshmukh) कार्यक्रमाला तरुण वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या सोहळ्याचे सूत्रसंचालन पुष्यमित्र जोशी यांनी, तर आभार प्रदर्शन संचालक अमोल वैद्य यांनी केले.