आर्णी (Arni Murder Case) : तालुक्यातील पारधी बेडा येथे भाऊजीने साळ्याची लोखंडी रॉडने हत्या केल्याची घटना काल ६ मे ला संध्याकाळी ६ वाजताच्या दरम्यान घडली आहे. गुडल्या नंदू पवार (२२) रा. पारवा असे मृतक युवकाचे नाव आहे. मुकेश उदयभान पवार (३२) रा. पारडी बेडा काठोडा असे आरोपीचे नाव आहे. मृतक हा आपली बहीण पूजा मुकेश पवार यांच्या भेटीसाठी आला असता त्याचा भाऊजी आरोपी मुकेश पवार याने जुन्या भांडणाचा वचपा काढत मृतक गुडल्या वर काठीने व लोखंडी रॉडने हल्ला करीत त्याची हत्या केली.
सदर घटनेची माहिती आर्णी पोलिसांना मिळताच आर्णी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व शवविच्छेदन करिता पाठविले आहे. तसेच घटनेच्या काही वेळात आर्णी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहे. (Arni Murder Case) घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप, एसडीपीओ दिनेश बैसाने यांनी घटनास्थाळी भेट दिली. तसेच पुढील तपास आर्णी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील नाईक यांच्या मार्गदर्शनात आर्णी पोलिस करीत आहे.




