गाव खेडयातील लुप्त होनारी परंपरा कायम राखली!
कोरेगाव, चोप (Bhoi Community) : देसाईगंज तालुक्यातील कोरेगाव येथिल भोई समाजाने (Bhoi Community) बाहूल्यांचा लग्न (Marriage of Dolls) लाऊन गाव खेडयातील लुप्त होनारी परंपरा कायम राखली पावसाला सुरवात झाली की, मासेमारी बंद असते याकाळात भोई समाज व कोळी समाज (Spider Society) आपल्या परंपरेनुसार बाहुल्यांचा लग्न लावतात ही परंपरा कोरेगाव येथे कित्येक वर्षापासुन सुरु आहे, ती जपत भोई समाजाने बाहुल्यांचा लग्न लावला.
खेड्यापाडयात हे लग्न म्हट्ले की, फक्त आठवण राहीली!
बाहूल्यांचा लग्न म्हटले की, बालपण आठवते आधी गावागावात, चौका मोहल्यात लग्न लावायचे यात देनगी गोळा करून एका घरी बाहूला नवरदेव तर दुसऱ्या घरी नवरी बाहूली ठेवली जायची व रितीरीवाजानुसार (Custom) नवरदेवाची वरात वाजत गाजत नवरी घरी मंडपात न्यायचे व लग्न लावायचे व नंतर जेवनाचा कार्यक्रम आटपून पून्हा वाजत गाजत वरात दिवा घेऊन नवरदेव घरी परतायचे व दुसऱ्या दिवसी त्यांचे विधीनुसार विर्सजन करायचे. परंतू आता खेड्यापाडयात हे लग्न म्हट्ले की, फक्त आठवण राहीली.
विरंगुळा म्हणुन ह्या परंपरेने जन्म घेतला!
जानकार म्हणतात की, पूर्वी मृग नक्षत्र (Mrig Nakshatra) ते नारळी पार्णिमा या काळात मासोळ्या अंडे घालतात या काळात मासेमारी केली, तर मासोळ्यांच्या उत्पादनात कमतरता पडू नये, व नदी-नाल्यांना पूरपाणी वाढल्याने मासेमारी बंद असते. या खाली वेळेत विरंगुळा म्हणुन ह्या परंपरेने जन्म घेतला. मृगात शेतकामाला सुरवात होते. त्यामुळे हे लग्न सहसा सायंकाळीच लावल्या जाते. गेल्या अनेक वर्षापासुन गावागावात ही परंपरा सुरु होती, परंतू आता ही परंपरा लप्तू झालेली आहे. कोरेगाव येथिल भोई समाजाने ही परंपरा कायम राखत दरवर्षी प्रमाने याही वर्षी लग्न लावला. या लग्नात भोई समाजासह इतर समाजही या बाहुल्यांच्या लग्नाचे साक्षी बनले.