–ग्रामस्थांच्या अनेक वर्षांच्या मागणीची पूर्तता
कोरची (MLA Ramdas Masram) : तालुक्यातील जामनारा गावात ग्रामस्थांची अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी अखेर पूर्ण झाली. आज आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार आदरणीय रामदासजी मसराम यांच्या शुभहस्ते जामनारा येथे भव्य सभामंडपाच्या बांधकामासाठी भूमी पूजनाचा शुभारंभ करण्यात आला. या सोहळ्यात ग्रामस्थांमध्ये मोठा उत्साह होता.
गावकऱ्यांची ही मागणी अनेक वर्षांपासून होती. सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक उपक्रम तसेच ग्रामसभांसाठी कायमस्वरूपी व सुसज्ज ठिकाणाची कमतरता जाणवत होती. त्यामुळे ग्रामस्थांनी वारंवार सभामंडप उभारण्याची मागणी केली होती. (MLA Ramdas Masram) आमदार रामदासजी मसराम यांनी या गरजेची दखल घेत निधी उपलब्ध करून दिला आणि आज त्या मागणीची पूर्तता होत आहे.
या प्रसंगी आमदार मसराम (MLA Ramdas Masram) यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत सांगितले की, “गावाचा सर्वांगीण विकास हे आमचे ध्येय आहे. प्रत्येक गावात पायाभूत सुविधा उभारून समाजकारण, संस्कृती, शिक्षण आणि विकास या सर्व क्षेत्रात प्रगती व्हावी, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सभामंडप हा गावातील एकतेचे प्रतीक ठरेल आणि विविध कार्यक्रमांसाठी उपयुक्त ठिकाण म्हणून कार्य करेल.”
त्या वेळी उपस्थित काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष कोरची मनोजभाऊ अग्रवाल, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष कुरखेडा जीवन पाटील नाट, जिल्हा परिषद सदस्य रामसुराम काटेंगे, सागर वाढई, वाशिम शेख, कमलेश बारस्कर,रवि नंदेश्वर, बस्तर हलामी ,मायाराम होळी ,राजकुमार कोसारे ,प्रमेश हलामी, रामेश्वर गोटा, पंकज धामगये, नरेंद्र हलामी, परसराम घुमुळ, सुमन हलामी, ममता शहारे ,मिनाबाई नंदेश्वर, उषा तालमी, मेहतरु घटघुमर,मंगला हलामी, पल्लवी धामगये संगीता, घुमुळ सुमित्रा, हलामी मोनाली वालदे, उपस्थित होते.