मुलाचा घातपातानेच मृत्यू झाला असल्याचा आई चंदा डोबणे यांचा आरोप
भूषणच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी आमदार सुमित वानखेडे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
आष्टी/शहीद () : आष्टी येथील पेठ अहमदपूर आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य सेविका यांचा मुलगा (Bhushan Dobane death) भूषण गजानन डोबणे याचा पुणे येथील (Fergusson College Pune) फर्ग्युसन महाविद्यालयाचे आवारातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे ‘नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयातील’ वसतिगृहात मृत्यू झाला. त्याचा मृत्यू घातपाताने झाल्याचा आरोप आईने केला आहे. याप्रकरणी चौकशी करण्यासाठी आमदार सुमीत वानखेडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे.
पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात (Fergusson College Pune) विधी अभ्यासक्रमाचे प्रथम वर्षाला शासकीय कोट्यातून नंबर लागल्याने भूषण तेथे शिकत होता. १ मे महाराष्ट्र दिनी आई चंदा डोबणे यांनी मुलगा भूषणला दिवसभर फोन केला. परंतु मुलाने फोन रीसिव्ह केला नाही. दुसर्या दिवशी २ मे रोजी सकाळी आईला होस्टेलमधून फोन आला की मुलगा रुममध्ये बेशुद्ध अवस्थेत पडून आहे तुम्ही पुण्याला या. त्यानंतर भूषणची आई लगेच पुण्याकरिता निघाली असता परत तुमचा मुलगा मरण पावला आहे. तुम्ही लवकरात लवकर पुण्याला पोहचा, असा फोन आला.
पुण्याला पोहोचल्या असता मुलाचा मृतदेह ससुन हॉस्पिटलला आणल्याचे कळल्यावर ससुन हॉस्पिटलमध्ये गेल्यावर मुलाच्या मृतदेहाची पूर्ण पाहणी केली असता तेव्हा त्याला पायावर काळ्या स्वरूपाची जखम असल्याचे दिसून आली. यावेळी आईने (Bhushan Dobane death) भूषणचा मृत्यू हा घातपाताने झाला असल्याची शंका व्यक्त केली. शवविच्छेदन करण्यापूर्वी तेथे उपस्थित पोलीसांनी भूषणच्या रुममध्ये डॉक्टरांची चिठ्ठी आणि गोळ्या आढळुन आल्याचे सांगितले. या प्रकरणात भूषणच्या आईचा संशय हॉस्टेलमधील राहत असलेले मुलांवर आणि वसतीगृह प्रशासनावर घातपाताचा संशय आला आहे. कारण होस्टेल प्रशासनाने त्याचे बाजूच्या रूममध्ये राहत असलेल्या मुलांची नावे सांगितली नसुन तिथे कोण उपस्थित होते याची माहिती देणेसुध्दा टाळले.
ज्या डॉक्टरांची चिठ्ठी त्याच्या रुममध्ये आढळली. त्या डॉक्टरांची पोलिसांनी बयान नोंदविले. मात्र त्यांची नावे (Bhushan Dobane death) भूषणचे आईला अजूनपर्यंतही सांगितले नाही. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजमध्येसुध्दा काहीही नसल्याचे भ्रमणध्वनी वरून भूषण यांच्या आईला सांगितले. आष्टी आणि पुणे हे अंतर फार लांब असल्याने भ्रमणध्वनीवरून भूषणची आई आणि आप्तेष्ट चौकशी करत आहे. मात्र होस्टेल प्रशासन आणि पोलीस प्रशासना कडुन योग्य माहिती मिळत नसल्यामुळे भूषणचा मृत्यू हा घातपातानेच झाला आहे, असा आरोप भूषणची आई चंदा गजानन डोबणे यांनी केला आहे.