पालोरा (Farmers Bonus) : मोहाडी तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात आतुरतेने बोनसची वाट बघत आहेत. परंतु शेतकर्यांना मोठा एक फटका बसल्याने शेतकर्यांवर एक संकटच कोसळले आहे. सविस्तर असे की शासकीय धान केंद्र सुरू न केल्यामुळे शेतकर्यांना धानाचे बोरे कुठे ठेवायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कमी भावात (Farmers Bonus) शेतकर्यांनी बाजार समितीमध्ये किंवा व्यापार्यांना धान विक्री केले जात आहे आणि नगदी पैसे मिळत असल्यामुळे ज्या कोणाकडून उसनवारी पैसे घेतले असेल त्यांचे देणे होऊन जाईल, या आशेने धान विक्री केली असल्याने एकप्रकारे शेतकर्यांवर अन्याय होत आहे.
राज्य सरकारने सरसकट शेतकर्यांना बोनस देण्याचे आश्वासन दिले आणि तसा आदेश शुध्दा काढण्यात आला असल्यावरही शेतकर्यांनी शासकीय केंद्रावर धान विक्री न करता तात्काळ पैसे मिळतात म्हणून खाजगी व्यापाराना किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीवर धान विक्री केली जात आहे. शेवटी राज्य शासनाने ज्या शेतकर्यांनी आधारभुत धान खरेदी केंद्रावर धान विक्री केली आहे अशाच (Farmers Bonus) शेतकर्यांच्या खात्यावर बोनसची रक्कम जमा केली आहे. ज्या शेतकर्यांनी केंद्रावर धान विक्री केली नाही अशा शेतकर्यांच्या खात्यावर बोनसची रक्कम जमा झाली नसल्यामुळे शेतकर्यांना अडचणीचा सामना करण्याची वेळ आली आहे.
राज्य सरकारने शेतकर्यांची दिशाभूल केली आहे. शेतकरी आतुरतेने बोनसची वाट बघत आहे. आपल्याला बोनस मिळेल त्या पैसातुन आपल्याला शेतीच्या लागवडीकरीता कामात येथील पण शेवटी देव कोपला आहे असेच शेतकर्यांचे म्हणणे आहे. बोनस मिळेल या आशेने आजही (Farmers Bonus) शेतकरी वाट बघत आहे. काही शेतकर्यांचे रोवणी झाली आहे पण मजुरीचे पैसे द्यायला नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आपल्याला बोनस मिळेल या आशेवर शेतकर्यांनी उदार उसने न घेता बोनस ची वाट बघता बघता असतांनाही बोनस आलेला नाही. त्यामुळे (Farmers Bonus) शेतकरी मोठ्या प्रमाणात आतुरतेने बोनसची वाट बघत आहे, तरी तत्काळ शेतकर्यांना बोनस देण्यात यावा, अशी मागणी मोहाडी तालुक्यातील शेतकर्यांकडून होत आहे.




