रस्ता ओलांडताना दुचाकीने दिली धडक दुचाकीवरील दोघे जखमी!
परभणी (Bike Accident) : नृसिंह जन्मोत्सव साजरा करुन गावाकडे परत जात असताना रस्ता ओलांडताना दुचाकीने दिलेल्या धडकेत साठ वर्षीय वृध्दाचा मृत्यू झाला. ही घटना रविवार 11 मे रोजी सायंकाळी साडे सातच्या सुमारास गंगाखेड रोडवर ताडपांगरी फाट्याजवळ घडली.
तुकाराम भुजंगराव कांबळे वय 60 वर्ष, असे मयताचे नाव आहे. या अपघाताविषयी अधिक माहिती अशी की, नृसिंह जन्मोत्सव साजरा केल्या नंतर तुकाराम कांबळे हे ताडपांगरी येथे घरी जाण्यासाठी निघाले. ताडपांगरी फाटा येथे रस्ता ओलांडत असताना परभणीकडून येणार्या एम.एच. 22 बी.ए. 0168 या क्रमांकाच्या दुचाकीने त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले. तर तुकाराम कांबळे यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना सहारा रुग्णवाहिकेच्या सहाय्याने परभणी येथील शासकीय रुग्णालयात (Government Hospital) दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी दैठणा पोलिसात नोंद (Report to Police) करण्यात आली आहे.
दुचाकीच्या धडकेत गृहरक्षक दलाचा जवान जखमी!
जुना पेडगाव रोडवरील प्रशिक्षण केंद्रात कवायतीसाठी जात असलेल्या, गृहरक्षक दलाच्या जवानाला (Home Guard) एम.एच. 22 ए.सी. 0700 या क्रमांकाच्या दुचाकी चालकाने जोराची धडक दिली. अपघातात गृहरक्षक दलाचे जवान रावसाहेब गायकवाड गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी सकाळी सात वाजता घडली. अपघाताची माहिती समजताच कंपनी कमांडर माणिक ढाले (Company Commander Manik Dhale) इतर होमगार्डनी घटनास्थळी धाव घेत रावसाहेब गायकवाड यांना रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासाठी त्यांना छत्रपती संभाजी नगर येथे खाजगी रुग्णालयात (Private Hospital) दाखल करण्यात आले आहे.