इरतकर, शेख, गोरे यांनी दाखवली माणुसकी!
रिसोड (Bike Accident) : अज्ञात वाहनाने दुचाकीला दिली मागून धडक दिल्याने या धडकेत पती जख्मी तर पत्नी गंभीर हि घटना रिसोड शहरातील वन उद्यानाजवळ मेहकर फाटा नजिक 9 ऑगस्ट रात्री 9:45 वा घडली. वैभव गजानन शेजुळ वय 22 वर्ष, सीमा वैभव शेजुळ वय 20 वर्ष राहणार गुंधा तालुका लोणार जिल्हा बुलढाणा अशी जखमीचे नाव असून, वाशीम वरुन आपल्या गावाकडे दुचाकी ने जात असताना, मेहकर फाट्याजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिल्याने सदर घटना घडली. जखमी अवस्थेत दोघांनाही रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात (Rural Hospital) भरती केले असता, प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी दोघांनाही वाशीम येथे पाठवण्यात आले आहे. सदर घटना घडली यावेळी या ठिकाणी काही नागरिकांची गर्दी झाली होती.
माणुसकी अजूनही जिवंत आहे, याची एक उदाहरण!
जखमींना उचलून रुग्णालयात नेण्या ऐवजी या ठिकाणी काही नागरिक मोबाईल फोटो काढत होते तर काही फक्त बघ्याची भूमिका घेत होते. मात्र अशातच आपल्या शेतातून आपल्या घराकडे जात असलेले, शिवसेना उबाठा गटाचे शहर प्रमुख संजू भाऊ इरतकर व त्यांचे सोबत असलेले, त्यांचे मित्र शेख आनिस उर्फ अण्णा यांनी तात्काळ जखमींना उचलून त्यांना विचारपूस केली. यावेळी या ठिकाणी गजानन माणिक गोरे राहणार एकलासपूर हे आपल्या आटो घेऊन आपल्या गावाकडे जात होते या ठिकाणी संजू भाऊ इरतकर यांनी लगेच गोरे यांना ऑटो घेऊन जखमींना घेऊन रिसोड येथील ग्रामीण रुग्णालय गाठले. या ठिकाणी तातडीने रुग्णालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर उपचार केला. संजू भाऊ इरतकर त्यांचे मित्र व ऑटो चालकांनी दाखवलेली तत्परता यामुळे जखमींना वेळेवर उपचार भेटला. काही वेळ जर पुन्हा गेला असता, तर काही अघटीत झाले असते. अशी चर्चा रुग्णालयात वर्तवली जात होती. संजू भाऊ इरतकर शेख अनिस व गजानन गोरे यांनी केलेली मदत बद्दल जखमी वैभव शेजुळ यांनी तिघांचेही आभार मानले. यामुळे माणुसकी अजूनही जिवंत आहे, याची एक उदाहरण पाहायला मिळाले.




