पिठलं भाकर खाऊन काँग्रेस पदाधिकार्यांचे आंदोलन तर राष्ट्रवादी शरद पवार गटाने काळ्या फिती बांधून केला निषेध!
परभणी (Black Diwali) : दिवाळीपूर्वी शेतकर्यांच्या (Farmers) खात्यात अतिवृष्टीचे अनुदान जमा करण्याचे राज्य सरकारने आश्वासन दिले होते. मात्र आता दिवाळी संपत आली आहे. शेतकर्यांनी कधी सण साजरा करायचा? असा प्रश्न उपस्थित करत सोमवार २० ऑक्टोबर रोजी राज्य सरकारच्या (State Govt) निषेधार्थ जिल्हा काँग्रेस पदाधिकारी आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्यावतीने आंदोलन करत काळी दिवाळी साजरी केली.
शासनाला जागे करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर युती सरकारच्या निषेधार्थ आंदोलन!
परभणी जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी (Heavy Rain), ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील ५२ मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. शेतकर्यांच्या खरिप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना दिवाळीपूर्वी अनुदानाचे वाटत त्यांच्या खात्यात जमा होतील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद ्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र अद्यापही शेतकर्यांना आर्थिक मदत मिळाली नाही. शेतकर्यांची दिवाळी फार अडचणीची झाली. दिवाळी संपत आली तरीही शेतकर्यांना हा आनंदाचा सण साजरा करता आला नाही. शासनाला (Government) जागे करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर युती सरकारच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.
पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी!
परभणी जिल्हा व शहर जिल्हा काँग्रेस कमिटी च्या वतीने पिठलं भाकरी ठेचा खाऊन आंदोलन करत काळी दिवाळी साजरी करण्यात आली. या आंदोलनात काँग्रेसचे विधानसभा प ्रभारी अॅड.नुरोद्दीन चौधरी यांच्यासह माजी आ. सुरेश देशमुख, माजी आ. बाबाजानी दुर्राणी, माजी खा. तुकाराम रेंगे पाटील, माजी उप महापौर भगवान वाघमारे, प्रदेश सचिव अॅड. मुजाहिद खान, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख, नदीम इनामदार, रामभाऊ घाडगे, युवक जिल्हाध्यक्ष अमोल जाधव, बाळासाहेब रेंगे पाटील, विनोद कदम, सुनिल देशमुख, रवि सोनकांबळे, इंजि. सुहास पंडित, माजी पं.स. सदस्य अंगद सोगे, दिगांबर खरवडे, कल्याण लोहट, प्रदीप सोनटक्के, सिध्दार्थ भराडे, खदीर मांडाखळीकर, शिवाजी भालेराव, श्रीराम जाधव, खानम दुर्राणी, रत्नमाला सिंगणकर, श्रीमती जानुबी आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यकर्ते सहभागी!
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्यावतीने मौन धारण करत काळी दिवाळी साजरी केली. या आंदोलनात माजी आ. विजयराव गव्हाणे, जिल्हाध्यक्ष अजय गव्हाणे, संतोष बोबडे, प्रदीप वाव्हळे, गंगाधर जवंजाळ, सय्यद युनिस सरवर, गंगाप्रसाद यादव, मनोज थिटे, अमोल चांदवडे, मनोहर कदम, लखन चव्हाण, शाम गवारे, अॅड. अंकुश चव्हाण, रितेश काळे, अमोल पाचपुंजे, कुणाल गायकवाड, गजानन लव्हाळे, महादू खिस्ते, राजू आवाडे, संजय टेकाळे, एस.डब्ल्यु परसोडे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होते.