परभणी ग्रामीण, गंगाखेड पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद
परभणी (Parbhani Death Case) : विषारी द्रव प्राशन करुन दोघांनी आपले जीवन संपविल्याच्या घटना परभणी तालुक्यातील शहापुर, गंगाखेड तालुक्यातील ढवळकेवाडी येथे घडल्या. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. घटने मागचे नेमके कारण समजू शकले नाही.
परभणी तालुक्यातील शहापुर येथे गुणाजी मरीबा पांजगे वय ७७ वर्ष, यांनी मद्यपी अवस्थेत विषारी द्रव प्राशन केले. त्यांना उपचारासाठी परभणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. (Parbhani Death Case) उपचारा दरम्यान १ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला.
सिताबाई पांजगे यांच्या खबरीवरुन परभणी ग्रामीण पोलिसात (Parbhani Death Case) अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तपास पोह. नबी करत आहेत. तर दुसरी घटना गंगाखेड तालुक्यातील ढवळकेवाडी शिवारात १ सप्टेंबर रोजी रात्री उघडकीस आली. केशव उत्तम राठोड वय ३५ वर्ष, याने शेतात कोणत्यातरी कारणावरुन विषारी द्रव पिले. यात त्याचा मृत्यू झाला. तपास पोह. व्यवहारे करत आहेत.
व्यसनाधीनतेमुळे तरुणाचा मृत्यू
परभणी : अतिप्रमाणात दारुचे सेवन केल्याने २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी १ सप्टेंबर परभणी ग्रामीण पोलिसात (Parbhani Death Case) अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. ज्ञानेश्वर बळीराम सामाले वय २२ वर्ष, रा. टाकळी कुं. असे मयताचे नाव आहे. नरहरी सामाले यांनी खबर दिली आहे. तपास पोना. धबडे करत आहेत.