विद्यमान अध्यक्षांसह मातब्बर पराभूत
अध्यक्ष पदासाठी होणार रस्सीखेच
अध्यक्ष पदासाठी होणार रस्सीखेच
भंडारा (Milk Union Election) : भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघाच्या संचालक मंडळाच्या पंचावार्षिक निवडणुकीत काँग्रेस समर्थित शेतकरी विकास पॅनल व राष्ट्रवादी काँग्रेस – भाजप समर्थित सहकार विकास पॅनल यांना समसमान जागा मिळाल्या आहेत. या (Milk Union Election) निवडणुकीत विद्यमान अध्यक्षांसह मातब्बरांना पराभवाची धूळ चाखावी लागली. दि. २८ जून २०२५ रोजी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सायंकाळी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आला. यात पटोले विरुद्ध पटेल यांच्यात रंगलेल्या निवडणुकीच्या सामन्यात दोन्ही पॅनलचे सहा-सहा उमेदवार विजयी झाले.
जिल्हा सहकारी दुग्ध संघाच्या १२ संचालकांच्या निवडीसाठी निवडणूक जाहीर झाली. या दुग्ध संघाच्या निवडणुकीसाठी २५ उमेदवार रिंगणात होते. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा साकोलीचे आ. नाना पटोले व भंडाराचे खा. डॉ. प्रशांत पडोळे पुरस्कृत विद्यमान अध्यक्ष रामलाल चौधरी यांच्या नेतृत्वातील काँग्रेसचे शेतकरी विकास पॅनल आणि जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सुनील फुंडे व विधान परिषदेचे सदस्य परिणय फुके पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेस – भाजप प्रणीत शरद इटवले यांच्या नेतृत्वातील सहकार विकास पॅनल आमनेसामने उभे ठाकल्या होत्या. त्यामुळे या (Milk Union Election) निवडणुकीत मोठी चुरस वाढली होती.
दरम्यान शनिवारी मतदानानंतर झालेल्या मतमोजणीनंतर शेतकरी विकास पॅनलचे नरेश पोटफोडे (मोहाडी), मुकुंदा आगासे (तुमसर), शरद कोरे (लाखनी), आशीष पातरे (विमाप्र), विवेक पडोळे (इमाव) व आशिष मेश्राम (अजा-अज), असे सहा उमेदवार विजयी झाले. तर सहकार विकास पॅनलचे हितेश सेलोकर (भंडारा), विलास काटेखाये (पवनी), मनोहर लंजे (साकोली), विलास शेंडे (लाखांदूर) व अनीता तितिरमारे आणि अस्मिता शहारे (महिला राखीव), असे सहा उमेदवार विजयी झाले आहेत. येथे अध्यक्ष पदासाठी मात्र जोरदार रस्सीखेच होणार आहे, हे मात्र नक्की.
भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक संघाची निवडणूक ही आ. नाना पटोले, खा. डॉ. प्रशांत पडोळे यांचेसाठी तर खा. प्रफुल्ल पटेल, सुनिल फुंडे, आ.डॉ. परिणय फुके यांच्या प्रतिष्ठेची झाली होती. ही निवडणूक चुरशीची ठरणार याचे संकेत सुरुवातीपासूनच दिसू लागले होते. (Milk Union Election) झालेल्या निवडणुकीत मतदारांनी मातब्बर उमेदवारांना धूळ चाखावी लागली. या निवडणुकीवरुन आगामी होणारी जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक देखील चुरशीची ठरणार.
काँग्रेस समर्पित पॅनलचे विजयी उमेदवार
शरद यावद कोरे, नरेश दत्तू पथोडे, मुकुंद रतिराम आगाशे, विवेक यादवराव पडोळे, आशिष रामराव पात्रे, आशिष प्रकाश मेश्राम, हे उमेदवार विजयी ठरले.
भाजपा समर्पित पॅनलचे विजयी उमेदवार
मनोहर बापूराव लंजे, विलास रामकृष्ण शेंडे, विलास रामकृष्ण काटेखाये, हितेश नामदेव सेलोकर, अस्मिता निरज शहारे, अनिता सुभाष तितीरमारे