Nepal Plane Crash:- नेपाळमधून एका मोठ्या अपघाताची (Accident)बातमी समोर आली आहे. बुद्ध एअरलाइन्सच्या (Buddha Airlines) विमानाला उड्डाण दरम्यान आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. विमानाच्या डाव्या इंजिनमध्ये आग लागली, त्यानंतर विमानाचे काठमांडू (Kathmandu) येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर मॅन्युअल लँडिंग करण्यात आले.
Buddha Air flight makes VOR landing at Tribhuvan International Airport in Nepal's Kathmandu after sustaining a flame out from the left engine. The aircraft had 76 people on board including the crew: Tribhuvan International Airport pic.twitter.com/IHbxcXriRk
— ANI (@ANI) January 6, 2025
अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही
विमानात क्रू मेंबर्ससह ७६ लोक होते. या अपघातात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. नेपाळ सरकारने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. बुद्ध एअरचे विमान राजधानी काठमांडूपासून ४३ किलोमीटर पूर्वेला त्याच्या डाव्या इंजिनमध्ये आग लागल्याने उतरल्याचे वृत्त आहे. त्यानंतर ते एकाच इंजिनवर उड्डाण करून काठमांडूला परतले. त्यानंतर सकाळी 11:15 वाजता त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर मॅन्युअल लँडिंग केले. विमानातील सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स पूर्णपणे सुरक्षित आहेत.
VOR लँडिंग म्हणजे काय?
VOR लँडिंग ही वैमानिकांची VOR (अति हाय फ्रिक्वेन्सी ओम्निडायरेक्शनल रेंज) नावाच्या ग्राउंड-आधारित रेडिओ स्टेशनवरून दिशानिर्देश वापरून त्यांचे विमान नेव्हिगेट आणि लँड करण्याची एक पद्धत आहे. हे तंत्रज्ञान वैमानिकांना धावपट्टीशी जुळवून घेण्यास मदत करते. हे विशेषतः तेव्हा घडते जेव्हा पायलट स्पष्टपणे पुढे पाहू शकत नाहीत. हा अपघात का झाला? इंजिनमध्ये बिघाड होण्याचे कारण काय, या सर्व बाबींचा तपास सुरू आहे.