कन्हान (Mahaparitrana Recitation) : अश्विन पौर्णिमेच्या निमित्ताने, सिद्धार्थ कॉलनी, गणेश नगर कन्हान येथील बुद्ध विहारात धम्मगुरु भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या नेतृत्वात वर्षावास समाप्ती निमित्त महापरित्राण पाठाचा कार्यक्रम संपन्न झाला.
बुद्धिस्ट वेलफेअर सोसायटी, कन्हान तसेच परिसरातील बौद्ध उपासक, उपासिका आणि अनुया यांनी आयोजन केले होते. संपूर्ण कन्हानमध्ये पंचशील ध्वजाने शांतीचे प्रतिक म्हणुन लावण्यात आले. तसेच विहारात (Mahaparitrana Recitation) महापरित्राण पठण करण्यात आले. धम्मगुरुं च्या प्रवचनानंतर सर्व भिक्खुंना चिवर दान व भोजन देण्यात आले. भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या मार्गदर्शनात भदंत के.सी.एस. लामा यांनी वर्षावासा दरम्यान तथागत बुद्ध आणि त्यांच्या धम्मदेशनांचे वाच न केले होते. तसेच भदंत आर्य के.सी.एस.लामा यांनी बौद्ध उपासक उपासक यांना सांगितले की, आषाढी पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा पर्यंत नियमित तीन महि न्या पर्यंत वर्षावास कार्यक्रमात ‘बुद्ध चरित्र आणि तथा गत बुद्ध यांच्या धम्मदेशना’ ग्रंथाचे रोज पठण करण्या त आले. या वर्षावास समाप्ती निमित्त भव्य भोजनदा नाचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचा आस्वाद कन्हान च्या जनतेने घेतला. या पावन कार्यात कन्हान परिक्षेत्रातील बौद्ध अनुयायांनी वर्षावास संपन्न करून शांती आणि बौद्ध धम्माचा महत्त्वाचा संदेश दिला.
यावेळी बुद्धिस्ट वेलफेअर सोसायटी, कन्हान कार्याध्य क्ष भगवान नितनवरे, विनायक वाघधरे, दौलत ढोके, शैलेश माटे, शालु गजभिये, सुदाम नितनवरे, आनंद चाहिंदे, पुंडलिक मानवटकर, सूर्यभान ढोके, प्रभुदास धनविजय, गौतम खंडारे, चंद्रशेखर डोंगरे, राजेश फुलझेले, रमेश चव्हान, राजेन्द्र फुलझेले, विदेश भोवते , प्रविण चांदुरकर, स्वप्निल वाघधरे, पूनम उके, शुभम पाटील, फुलवंता उके, सुजाता मेश्राम, पिंकी मेश्राम, दुर्गा गजभिये, कल्पना नितनवरे, जिजाबाई मानवटक र, गीता सतदेवे, नमिता फुलझेले, संगिता बोरकर, लता मंडपे, अर्चना फुलझेले, बबीता मानवटकर, अनि ता दुपारे, दुर्गा गजभिये, अर्चना चव्हाण, शिला बागडे, रजनी कुंभारे, रजनी पाटील, सुजाता नारनवरे, सिंधु वाघमारे, कमला गटपाळे, वैयजंती पाटील सह अनेक बौद्ध उपासक आणि उपासिका उपस्थित होते.