७ पैकी ५ जागा महाविकास आघाडीला मिळतील: खा. वासनिक
बुलडाणा (Buldhana Assembly Constituency) : मोदींवर काय बोलता, स्थानिक आमदारांवर बोला. त्यांची गुंडागर्दी, त्यांनी कमावलेला पैसा चव्हाट्यावर आणा. भिता कशाला व कुणाला ? थेट भिडा.. असा सल्ला काँग्रेस नेत्यांना दिला तो (Nanabhau Gawande) प्रदेश उपाध्यक्ष नानाभाऊ गावंडे यांनी. तर (Buldhana Assembly Constituency) बुलढाणा जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांपैकी ५ ते ६ मतदार संघात महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) उमेदवार विजयी होईल, असा दावा केला तो अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा राज्यसभा खासदार मुकुल वासनिक (MP Mukul Wasnik) यांनी !
संजय राठोड आयोजित “रोजगार महोत्सव २०२४” साठी शुक्रवार 30 ऑगस्ट रोजी बुलढाणा येथे आलेल्या काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची शाळाच नानाभाऊ गावंडे यांनी घेतली. नेत्यांना उद्देशून ते म्हणाले की, भाषण करताना थोडं कमी बोललं तरी चालेल परंतु कार्यकर्त्यांची नावे सुटू देऊ नका. त्यांच्यामुळेच पक्ष जिवंत राहतो. या मंचावरील अर्ध्याअधिक नेत्यांमुळे मुकुल वासनिक या जिल्ह्यातून गेल्यापासून लोकसभेला यश मिळू शकले नाही. यावेळी २०२४ ला चांगली संधी चालून आली होती, भाजपाचा पराभव करायचा हा निर्धार ठेवून कुठल्याही परिस्थितीत महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येऊ शकला असता.. तो परंतु प्रतापरावांना पाडण्यासाठी खेडेकरांना मते देण्याऐवजी अपक्ष तुपकारांना का चालवल्या गेले ? असा सवाल त्यांनी केला.
भाषणात मोदींवर बोलून काहीही साध्य होणार नाही, तुम्हाला जर बोलायचे असेलतर तुमच्या तुमच्या आमदारांच्या विरोधात बोला. त्यांची पोलखोल करा. संजय गायकवाड असो की श्वेताताई महाले, यांनी काय चालवले हे सर्वांना माहीत आहे. पण त्यांच्या विरोधात बोलण्याची हिंमत स्थानिक काँग्रेसवाले करत नाही. तुम्ही भिता कशाला ? जोपर्यंत भीती सोडून तुम्ही थेट भेटणार नाही तोपर्यंत तुमची काहीही खरे नाही, वासनिकांच्या नावावर कुठपर्यंत चालवणार ? तुम्हालाच पुढे यावे म्हणजे लागेल.. तरच आगामी (Assembly Constituency) विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या आमदारांचा पराभव होऊन महाविकास आघाडीला विजय मिळेल, असे नानाभाऊ गावंडे म्हणाले.
खा. मुकुल वासनिक (MP Mukul Wasnik) यांनी (Buldhana Assembly Constituency) बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेस व पर्यायाने महाविकास आघाडीची परिस्थिती अतिशय चांगली असल्याचे सांगत, काँग्रेसकडे जास्तीत जास्त जागा घेण्याचा विचार बोलून दाखवला. परंतु महाविकास आघाडीतल्या कोणत्याही पक्षाला जागा सुटली तरी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मनापासून काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. असे झाले तर आगामी विधानसभा निवडणुकीत ७ पैकी ५ ते ६ जागा काँग्रेसला मिळतीलच, असा ठाम विश्वास खा. वासनिक (MP Mukul Wasnik) यांनी व्यक्त केला.