विकासकामांच्या माध्यमातून जपतो जनतेशी बांधिलकी- आ. गायकवाड
बुलढाणा (Buldhana Development) : शहरात जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या, कर्तव्यदक्ष व लोकप्रीय आमदार धर्मवीर संजुभाऊ गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांच्याहस्ते ११ कोटी रुपये किमतीच्या विकासकामांचे भव्य भूमिपूजन उत्साहात पार पडले. हा सोहळा आज रविवार २७ जुलै रोजी प्रभाग क्रमांक ११ मध्ये शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला. या (Buldhana Development) विकास कामांमध्ये मुख्यत्वे प्रभाग क्र.११ मधील तहसील चौक ते सर्कुलर रोड दरम्यान रस्त्याचे काँक्रिटीकरण, दोन्ही बाजूंनी नाली बांधकाम व पेव्हर ब्लॉक बसविणे. बुलढाणा प्राईड ते एस.बी.आय. इनटच मार्गाचे काँक्रिटीकरण, नाली बांधणी व पेव्हर ब्लॉकची सुविधा या कामांचा समावेश आहे.
या (Buldhana Development) कार्यक्रमाला भाजपाचे ज्येष्ठ नेते व्ही.डी. पाटील, युवासेनेचे मृत्युंजय संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad), शिवसेना नेते विजय अंभोरे, जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, नगराध्यक्ष विठ्ठलराव येवले, मुख्याधिकारी गणेश पांडे, तसेच अनेक पदाधिकारी, महिला नेत्या, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विकासकामांचा थेट लाभ स्थानिक नागरिकांना मिळणार असून, रस्त्यांची मजबुती, पावसात साचणाऱ्या पाण्यापासून होणारे त्रास, तसेच (Buldhana Development) वाहतुकीतील अडथळे यावर कायमस्वरूपी तोडगा निघणार आहे. या वेळी बोलताना आ. संजुभाऊ गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) म्हणाले की, विकासकामे ही केवळ मूलभूत सुविधा नाहीत, तर जनतेशी असलेली आमची बांधिलकी आणि सेवेचा व्रतही आहे. जनतेसाठी झटणे हेच आमचे ध्येय आहे. प्रभाग ११ मध्ये होत असलेली ही कामे हे केवळ रस्ते विकासाचे नव्हेतर विश्वास, कृतिशीलता आणि जनतेशी असलेला प्रत्यक्ष संवाद याचे प्रतीक ठरत असल्याचे संजूभाऊ म्हणाले.