बँकेकडून केंद्रीयमंत्री ना. जाधव यांचा उद्या सत्कार !
बुलडाणा (Prataprao Jadhav) : जिल्हा बँकेमार्फत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांचा सत्कार सोहळा व सहकार कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन उद्या शुक्रवार 19 जुलै रोजी सकाळी 11 वाजता (Buldhana District Bank) बँकेच्या सभागृहात करण्यात आले आहे. जिल्हा बँकेला 300 कोटी रुपयांचे सॉफ्ट लोन मंजूर होऊन प्राप्त झाल्यानंतर पहिल्यांदा सहकाराचा हा सोहळा होत आहे.
बुलडाणा जिल्हा (Buldhana District Bank) केंद्रीय सहकारी बँकेमार्फत19/07/2024 रोजी सकाळी 11 वाजता केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांचा सत्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा बँकेचे मुख्य कार्यालय बुलडाणा येथील सहकारमहर्षी स्व. भास्कररावजी शिंगणे सभागृहामध्ये करण्यात आले आहे. जिल्हा बँकेला शासन हमीवर राज्य सहकारी बँकेकडून रु.300 कोटी सॉफ्ट लोन मंजूर झालेले आहे. त्यामुळे निश्चितच जिल्हा बँकेला नवसंजीवनी प्राप्त होणार असुन जिल्हा बँकने यानिमित्ताने सहकार कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यास जिल्ह्यातील सर्व विद्यमान आमदार तसेच सर्व माजी आमदार व सहकार क्षेत्रातील सर्व आजी-माजी पदाधिकारी हजर राहणार आहेत.
बँकेला मंजूर झालेल्या 300 कोटी निधीमधुन विविध प्रकारचे कर्जवाटप करण्यासाठी (Buldhana District Bank) बँकेने केलेल्या नियोजनाप्रमाणे सुरक्षित कर्जाचे वाटप केले जाणार आहे. या कर्जवाटपामुळे बँकेस निरनिराळे उत्पनाचे स्रोत निर्माण होऊन बँकेच्या उत्पनामध्ये वाढ होऊन बँक पुर्वपदावर येणार आहे. याद्वारे जिल्ह्यातील सर्व नागरी बँका, नागरी पतसंस्था, ग्रामसेवा, वि.का. सह.संस्था तसेच इतर सर्व सहकारी संस्था यांना कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोकराव खरात यांनी केले आहे.