प्रख्यात व्याख्याते गणेश शिंदे यांचे तिन दिवस ज्ञानेश्वरी व्याख्यान
बुलडाणा (Buldhana Urban) : दरवषीप्रमाणे याही वर्षी बुलढाणा परिवाराकडून (Buldhana Urban) बुलढाणा अर्बन गणेशोत्सव मंडळाची (Ganeshotsav 2024) स्थापना करण्यात आली आहे. बुलढाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाचे वतीने दरवषी गणेश उत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यावर्षी नाविन्यपूर्ण उपक्रम मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या जात आहे, यामध्ये दि. 14 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6.30 वा गोवर्धन ईमारत च्या सभागृहात ज्ञानेश्वरी वरील व्याख्यान प्रख्यात व्याख्याते श्री गणेश शिंदे या़चे आयोजित करण्यात आले आहे.
दरम्यान दि.7 सप्टेंबर रोजी बुलडाणा अर्बन (Buldhana Urban) मुख्यालयाच्या आवारात उभारण्यात येणाऱ्या मंडपात श्रींची स्थापना करण्यात येणार आहे. दि. 8 सप्टेंबर रोजी सकाळी अर्थवशिर्ष पठण होणार आहे. दि. 9 सप्टेंबर रोजी कर्मचारी कराओके गायन स्पर्धा होणार आहे,तर दि 13 सप्टेंबर रोजी शालेय विद्यार्थ्यांसाठी वकृत्व स्पर्धा गोवर्धन ईमारत च्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. दि. 13 सप्टेंबर रोजी दुपारी गोवर्धन ईमारत च्या सभागृहात कर्मचारी महिलांसाठी एक मिनिट हि स्पर्धा होणार आहे. दि. 14 सप्टेंबर रोजी दुपारी गोवर्धन ईमारत च्या सभागृहात महिला भजन स्पर्धा होणार आहे.
यावेळी मागील वर्षी प्रमाणे यंदाही कर्मचाऱ्यांसाठी वृक्षारोपण -वृक्ष लावा बक्षीस मिळवा या धरतीवर वृक्षारोपण चे वाटप करण्यात येणार आहे. दि 18 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.00 वा आनंद मेळावाने गणेशोत्सवचे समारोप होणार आहे. (Buldhana Urban) बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाच्या (Ganeshotsav 2024) वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धांचा लाभ शहर व परिसरातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष महेश चेकेटकर व सचिव प्रशांत काळवाघे व गणेशोत्सव मंडळ कार्यकारणी सदस्यांनी केले आहे.