गृह विभागाची कामगिरी!
रिसोड (Burglary Case) : रिसोड पोलिसांनी व गुन्हे शाखा वाशिम (Crime Branch Washim) संयुक्त तपास मोहीम राबवत जिल्ह्यातील विविध ठिकाणी झालेल्या घरफोड्यांचे 10 गुन्हे उघडकीस आणले. या कारवाईत दोघा आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून एकूण 11 लाख 17 हजार 740 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही माहिती पोलिसांकडून सोमवार, 21 जुलै रोजी देण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखा आणि रिसोड पोलिसांना संयुक्त तपासाचे आदेश!
रिसोड पोलिस स्टेशन येथे 1 मार्च 2025 रोजी मोप येथील राजेश श्रावण बलकार यांच्या फिर्यादीवरून भा.दं.वि. कलम 305 (अ), 331 (4) बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला होता. या प्रकरणाच्या तपासादरम्यान, पोलिसांनी बुलढाणा जिल्ह्यातील बीबी येथील ईश्वर ऊर्फ प्रभूराज युवराज पवार व वाशिम जिल्ह्यातील जांभरूण नावजी येथील शामराव रामकिसन पवार यांना ताब्यात घेतले. गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखा (Local Crime Branch) आणि रिसोड पोलिसांना संयुक्त तपासाचे आदेश दिले. सखोल तपासादरम्यान, दोन्ही आरोपींनी 10 घरफोड्यांची कबुली दिली. त्यांच्याकडून 112 ग्रॅम (11.2 तोळे) सोने, 500 ग्रॅम (50 तोळे) चांदी, एक मोबाईल, एक दुचाकी आणि रोख 4,500 रुपये असा एकूण 11 लाख 17 हजार 740 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलिस अधीक्षक लता फड, सहायक पोलिस अधीक्षक नवदीप अग्रवाल, पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी (स्थानिक गुन्हे शाखा), तसेच रिसोड पोलिस स्टेशनचे निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखा करण्यात आली. तपास पथकात सहाय निरीक्षक जगदीश बांगर, पोलि उपनिरीक्षक सचिन गोखले, शेट मास्कर, मीना पाथरकर, हवालदार प्रश राजगुरू, दीपक सोनोने, गजानन झ. विनोद घनवट आदींचा समावेश होता.