कपाटात ठेवलेली रोकड केली लंपास!
अज्ञातावर गुन्हा दाखल!
परभणी (Burglary) : परभणीच्या मानवत शहरातील तलाब कट्टा भागात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत ५० हजाराची रोकड लंपास केली आहे. ही घटना २८ ऑक्टोबरच्या दुपारी दिडच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळासाहेब लिपणे यांनी तक्रार दिली आहे. २७ ऑक्टोबरच्या सायंकाळी साडे सात ते २८ ऑक्टोबरच्या दुपारी दिड या दरम्यान अज्ञात चोरट्याने फिर्यादी हे गावी गेले असल्याची संधी साधत त्यांच्या घराच्या दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटात ठेवलेले रोख पन्नास हजार रुपये लंपास केली. चोरी झाल्याचे लक्षात आल्यावर मानवत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोह. शेख करत आहेत.
शेतातून सौरपंप लंपास!
सेलू तालुक्यातील हातनुर शिवारामधील शेतातून अज्ञात चोरट्यांनी सौर ऊर्जेवर चालणारे पंप व इतर साहित्य मिळून ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. सदर प्रकरणी शेख आल्लाबक्श यांच्या फिर्यादीवरुन २८ ऑक्टोबरला सेलू पोलिसात अज्ञात चोरट्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोह. राठोड करत आहेत.




