1 लाख 80 हजारांचा मुद्देमाल हस्तगत!
लातूर (Burglary) : घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीला 1 लाख 80 हजार रुपयांच्या मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेने अटक (Arrested) केली. या कारवाईतून आरोपीने केलेले नऊ गुन्हे उघड झाले आहेत. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, काही दिवसांपासून लातूर शहरातील वेगवेगळ्या दुकानांचे रात्रीच्या वेळी पत्रे कापून, कडीकोंडा तोडून आतमध्ये प्रवेश करून रोख रक्कम, मोबाईल फोन, चोरी केल्याची घटना घडल्या होत्या. त्यावरून पोलीस ठाणे शिवाजी नगर व एमआयडीसी येथे अज्ञात आरोपीता विरुद्ध गुन्हे दाखल (Crimes Filed) करण्यात होते.
आरोपीला चोरलेल्या मुद्देमालासह ताब्यात!
स्थानिक गुन्हे शाखेचे (Local Crime Branch) पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाला मिळालेल्या माहितीवरून 27 जून रोजी रेनापुर नाका परिसरातून दिनेश महादेव टेकाळे उर्फ शंकर दत्तात्रय पांचाळ, (वय 29 वर्ष राहणार हरिभाऊ नगर कृपासदन रोड, लातूर) या ताब्यात घेतले. तसेच त्याच्याकडून लातूर शहरातील विविध ठिकाणी चोरी करून चोरलेले मोबाईल फोन, तसेच रोख रक्कम, चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेले हॅन्डग्लोज, पक्कड, कटर, लोखंडी टॉमी असे साहित्य हस्तगत केले. या कारवाईत घोरपडी व चोरीचे 9 गुन्हे उघड झाले असून, एकूण 1 लाख ऐंशी हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त (Confiscation of Goods) करण्यात आला आहे. आरोपीला त्यांनी चोरलेल्या मुद्देमालासह ताब्यात घेऊन पुढील कारवाई करिता संबंधित पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आले आहे.
पोलीस पथकाची कारवाई!
सदरची कारवाई पथकातील पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे पोलीस अमलदार युवराज गिरी, राहुल सोनकांबळे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, सिद्धेश्वर मदने, जमीर शेख, राहुल कांबळे, गणेश साठे, साहेबराव हाके, रियाज सौदागर, मनोज खोसे, नितीन कठारे, शैलेश सुडे,अंजली गायकवाड यांनी केली.