सोन्याचे दागिने, रोख रक्कम लंपास!
परभणी (Burglary) : शहरातील विद्या नगर भागात घरफोडी करत चोरट्यांनी सोन्याचे (Gold) दागिने, रोख रक्कम मिळून 1 लाख 50 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी 2 ऑगस्टला नानलपेठ पोलीस ठाण्यात (Nanalpeth Police Station) गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे. शशिकांत शहाणे यांनी तक्रार दिली आहे.
अज्ञातावर नानलपेठ पोलिसात गुन्हा दाखल!
अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे लॉक तोडून आत प्रवेश करत कपाटात ठेवलेले 84 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने आणि रोख 50 हजार रुपये चोरुन नेले. ही घटना 24 मे च्या रात्री साडे आठ ते 1 जुनच्या सकाळी सात या दरम्यान घडली. घरफोडीची (Burglary) माहिती पोलिसांना देण्यात आली. चोरट्यांनी (Thieves) घरातून सोन्याची मोहनमाळ, एकदाणी, अंगठी व इतर दागिने चोरुन नेले आहेत. तपास पोउपनि. जटाळ करत आहेत.