1 लाख 82 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास परभणीच्या दैठणा पोलिसात गुन्हा!
परभणी (Burglary) : तालुक्यातील मांडाखळी येथे सेवानिवृत्त पशुवैद्यकाचे घर फोडत चोरट्यांनी (Thief) 1 लाख 82 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना मंगळवार 17 जून रोजी सकाळी साडे दहा ते दुपारी एक या दरम्यान घडली. सदर प्रकरणी अज्ञात चोरट्यावर दैठणा पोलीस ठाण्यात (Daithna Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहेद हुसैन खाजा हुसैन यांनी तक्रार दिली आहे. चोरट्यांनी त्यांचे घर फोडत कपाटात ठेवलेले रोख 1 लाख रुपये, सोन्याची गलसर, अंगठी व इतर दागिने (Jewelry) चोरुन नेले. 17 जून रोजी दिवसाढवळ्या चोरीची घटना घडली. दैठणा पोलिसांना माहिती देण्यात आली. सदर प्रकरणी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला असून तपास पोउपनि. सुर्यवंशी करत आहेत.