अनोळखी चोरट्यावर शहरातील नानलपेठ पोलिसात गुन्हा!
परभणी (Burglary) : पत्नीचा पाय मुरगळला असल्याने तिला उपचारासाठी गंगाखेडला घेवून गेले. या दरम्यान घर बंद असल्याचा फायदा घेत अनोळखी चोरट्यांनी घरफोडी करत सोन्या- चांदीचे दागिने व रोख रक्कम मिळून 1 लाख 15 हजार 201 रुपयांचा मुद्देमाल (Issue) लंपास केला. ही घटना शहरातील त्रिमुर्ती नगर येथे 30 जुनला सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी अनोळखी चोरट्यांवर नानलपेठ पोलीस ठाण्यात (Nanalpet Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाहेरगावी गेल्यावर घर फोडले!
प्रशांत शहाणे यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी यांच्या पत्नीचा पाय मुरगळला असल्याने ते उपचारासाठी पत्नीला घेवून गंगाखेडला गेले होते. 30 जुनला सकाळी परभणीतील त्रिमुर्ती नगरातील घरी आल्यावर त्यांना घरातील कडीकोंडा तुटलेला दिसला. आतमध्ये जावून पाहिल्यावर, त्यांना साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले. चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने (Gold And Silver Jewellery) व रोकड मिळून 1 लाख 15 हजार 201 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. घटनास्थळी श्वान पथक, ठसे पथकाला पाचारण करण्यात आले. सदर प्रकरणी नानलपेठ पोलिसात गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे. तपास पोउपनि. जटाळ करत आहेत.