हिंगोली शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत
हिंगोली (Siddeshwar Dam Pump Fire) : शहराला पाणी पुरवठा करणार्या सिध्देश्वर धरणाजवळील पंप हाऊसच्या केबलला मंगळवारी पहाटेच्या सुमारास आग लागल्याने केबल (Siddeshwar Dam Pump Fire) जळून खाक झाले. परीणामी शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला. केबलची पाहणी करून नवीन केबल टाकण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.
दुरूस्तीचे काम युध्दपातळीवर सुरू
हिंगोली शहराला सिध्देश्वर धरणातून पाणी पुरवठा (Siddeshwar Dam Pump Fire) केला जातो. सदर ठिकाणी धरणावर पंप हाऊस उभारण्यात आला असून डिग्रस कर्हाळे येथे उभारलेल्या जलशुध्दीकरण केंद्रामध्ये पाण्याचे जलशुध्दीकरण करून शहरातील जलकुंभामध्ये पाणीसाठा जमा केला जातो. शहरातील १७ प्रभागामध्ये रोटेशेन पध्दतीनूसार पाणी पुरवठा केला जातो.
सध्या उन्हाळा सुरू असल्याने या न त्या कारणावरून पाणी पुरवठा विस्कळीत होत असल्याने आठवड्यातून जवळपास एकदा पाणी पुरवठा सोडला जात आहे. १ एप्रिल मंगळवार रोजी सकाळच्या सुमारास सिध्देश्वर धरणावरील पंपहाऊसच्या (Siddeshwar Dam Pump Fire) केबलला आग लागली. त्याची माहिती मुख्याधिकारी अरविंद मुंढे, अभियंता वसंत पुतळे, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर यांना मिळताच पथकाने तात्काळ अग्निशामक दलाच्या बंबाव्दारे पोहचून आग विझविली.
या (Siddeshwar Dam Pump Fire) आगीमध्ये जवळपास ४ ते ५ लाख रुपयाचे नुकसान झाले. त्यानुसार दूरूस्तीचे काम युध्दपातळीवर सुरू करण्यात आले असून लवकरच शहरात पाणी पुरवठा सुरळीत चालू केला जाईल अशी माहिती देण्यात आली. दुरूस्तीकरीता न.प. पाणी पुरवठा अभियंता वसंत पुतळे, बाळू बांगर, सय्यद शकील, अमोल पाटोळे यांच्यासह इतर कर्मचारी युध्दपातळीवर काम करीत आहेत. नागरीकांनी पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन मुख्याधिकारी यांनी केले आहे.