बायपास उड्डाणपुलावरील घटना
भंडारा/खमारी/बुटी (Car-Truck Accident) : नागपूरकडे जाणार्या चारचाकी वाहनाला ट्रकने समोरासमोर धडक दिली. यात चारचाकी वाहनचालकासह त्याची पत्नी व मुलगी गंभीररित्या जखमी झाले. ही (Car-Truck Accident) घटना रायपूर-नागपूर महामार्गावरील बायपास उड्डाणपुलावर सालेबर्डी जवळ दि.३० मे रोजी रात्री ७.३० वाजतादरम्यान घडली. अजय जयस्वाल (५५), कविता अजय जयस्वाल (५०), सुहानी अजय जयस्वाल (२२), तिघेही रा.पारडी, जि.नागपूर, असे जखमींचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, अजय जयस्वाल हे आपल्या पत्नी व मुलीसोबत चारचाकी वाहन क्र.एमएच ४९ बीआर १५३१ ने रायपूर – नागपूर महामार्गावरील भंडारा येथून बायपास मार्गावरुन नागपूरकडे जात होते. यावेळी नागपूरकडून रायपूरकडे जाणार्या ट्रक क्र.एमएच ३६ एए ४३११ ने जबर धडक दिली. (Car-Truck Accident) धडक इतकी जोरदार होती की यात चारचाकी वाहनात बसलेले तिघेही गंभीररित्या जखमी झाले.
अपघाताची माहिती (Car-Truck Accident) मिळताच जगतगुरु नरेंद्रचार्य महाराज श्रीक्षेत्राची रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी पोहोचली व जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे भरती करण्यात आले. याप्रकरणी दोन्ही पक्षांकडून एकमेकांविरुद्ध कारधा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहवा सुभाष राठोड करीत आहेत.