पोलीस पाटील पदभरती

प्रशासकीय उदासीनतेचा फटका: भंडारजवासीय नऊ वर्षांपासून 'पोलीस पाटील' पदाच्या प्रतीक्षेत!

Police Patil Recruitment: भंडारज खुर्द आणि भंडारज बु.या गावांमध्ये पोलीस पाटील पद रिक्त असल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणी येत आहेत. शासकीय कागदपत्रांसाठी ८ किलोमीटरची पायपीट करावी लागते.

प्रशासकीय उदासीनतेचा फटका: भंडारजवासीय नऊ वर्षांपासून 'पोलीस पाटील' पदाच्या प्रतीक्षेत!

Police Patil Recruitment

 

शासकीय कामांसाठी ८ किलोमीटरची पायपीट; ग्रामस्थांचा संताप आणि संकटांचा पाढा

पातूर (Police Patil Recruitment) : पातूर तालुक्यातील भंडारज खुर्द आणि भंडारज बु. या दोन गावांसाठी प्रशासकीय अनास्था डोकेदुखी ठरत आहे. सुमारे अडीच हजार लोकसंख्या असलेल्या या परिसरात गेल्या ८ ते ९ वर्षांपासून पोलीस पाटील पद रिक्त असल्याने ग्रामस्थांचे अतोनात हाल होत आहेत.

नांदखेडची वारी अटळ

गावात हक्काचा पोलीस पाटील नसल्याने रहिवासी दाखला, ओळखपत्र आणि इतर अत्यावश्यक शासकीय कागदपत्रांवर स्वाक्षरी मिळवण्यासाठी ग्रामस्थांना सुमारे ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या नांदखेड गावाची वारी करावी लागते. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात असून, कामासाठी दिवसभर ताटकळत राहावे लागत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.

गावाच्या सुरक्षेचा आणि विकासाचा प्रश्न

पोलीस पाटील (Police Patil Recruitment) हे केवळ कागदपत्रांसाठी नसून गावातील शांतता राखणे, गुन्हेगारीची माहिती देणे आणि शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी महत्त्वाचे दुवा असतात. मात्र, हे पद रिक्त असल्याने खालील बाबींवर परिणाम होत आहे:

गावातील शांतता व सुव्यवस्थेवर देखरेख ठेवण्यात अडचणी येत आहेत.
नैसर्गिक आपत्ती किंवा साथीच्या आजारांच्या काळात मदतकार्यात समन्वय राहत नाही.
शासकीय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत वेळेत पोहोचत नाही.

प्रतिक्रिया
"पोलिस पाटील (Police Patil Recruitment) नसल्याने नागरिकांनी पायपीट करावी लागते, विद्यार्थ्यांना त्रास होते गावात अनेक पुढारी आहेत परंतु ते फक्त नावापुरते."
-किशोर सुरवाडे (सामाजिक कार्यकर्ते)

वारंवार मागणी करूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने, आता भंडारजवासीय आक्रमक भूमिकेत असून लवकरात लवकर या पदावर नियुक्ती करण्याची मागणी होत आहे.

संबंधित सामग्री

कळमनुरी उपविभागातील तीन पोलीस पाटील तीन महिन्यांसाठी निलंबित

कळमनुरी उपविभागातील तीन पोलीस पाटील तीन महिन्यांसाठी निलंबित

Police Patil suspended: गावात सुरू असलेल्या अवैध धंद्यांची माहिती जाणीवपूर्वक लपवून पोलीस प्रशासनाला सहकार्य न करणे आणि कर्तव्यात कसूर करणे तीन पोलीस पाटलांना चांगलेच महागात

Aug 31, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. श्रेनिक लोढा यांच्या मार्गदर्शनाने पोलीस पाटलांमध्ये नवा आत्मविश्वास  

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. श्रेनिक लोढा यांच्या मार्गदर्शनाने पोलीस पाटलांमध्ये नवा आत्मविश्वास  

Hingoli Police Patil: जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. श्रेनिक लोढा यांनी पोलीस पाटील यांच्या कार्याला अधिक बळ देण्यासाठी थेट संवाद साधत मोलाचे मार्गदर्शन केले. गावपातळीवर कायदा व सुव्यवस्था राखणे ही पोलीस..

Aug 20, 2026
अवैध धंद्याची माहिती दडविल्याने बळसोंडच्या पोलिस पाटील महिलेवर निलंबनाची कारवाई

अवैध धंद्याची माहिती दडविल्याने बळसोंडच्या पोलिस पाटील महिलेवर निलंबनाची कारवाई

Police Patil Suspension: अकोला बायपास ते गारमाळ जाणार्‍या रस्त्यालगत पोलिसांनी टाईम बाजार मटका जुगारावर छापा मारला होता. कार्यक्षेत्रात अवैध धंदे सुरू असल्यास त्याची माहिती पोलिस..

Aug 19, 2026
हेलिकॉप्टरने वाचवले प्राण; घरी आणताना अ‍ॅम्ब्युलन्स चिखलात अडकली!

हेलिकॉप्टरने वाचवले प्राण; घरी आणताना अ‍ॅम्ब्युलन्स चिखलात अडकली!

Gadchiroli Healthcare System: सर्पदंश झालेल्या दिपाली मडावी हिचा जीव वाचवण्यासाठी तिला गडचिरोलीहून हेलिकॉप्टरने नागपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले. नागपूर येथे उपचारानंतर प्रकृती सुधारली...

Aug 16, 2026
जिल्ह्यातील पोलीस पाटलांच्या जबाबदाऱ्या कडक; दुर्लक्ष केल्यास होणार शिस्तभंगाची कारवाई

जिल्ह्यातील पोलीस पाटलांच्या जबाबदाऱ्या कडक; दुर्लक्ष केल्यास होणार शिस्तभंगाची कारवाई

गाव पातळीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने पोलीस पाटलांना त्यांच्या कर्तव्यांची नव्याने आठवण करून दिली आहे.

Aug 14, 2026