महाराष्ट्र दप्तरमुक्ती अभियान

विद्यार्थ्यांचे दप्तर हलके होणार; राज्यातील शाळांमध्ये 'दप्तरमुक्ती अभियान' सुरु

Maharashtra Daptarmukti Abhiyan: विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे वाढते ओझे कमी करून शिक्षण प्रक्रिया अधिक आनंददायी, सुलभ आणि कृतिप्रधान करण्यासाठी राज्यातील सर्व प्रकारच्या शाळांमध्ये केंद्र शासन

विद्यार्थ्यांचे दप्तर हलके होणार; राज्यातील शाळांमध्ये 'दप्तरमुक्ती अभियान' सुरु

Maharashtra Daptarmukti Abhiyan

बाळापूर (Maharashtra Daptarmukti Abhiyan) : विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे वाढते ओझे कमी करून शिक्षण प्रक्रिया अधिक आनंददायी, सुलभ आणि कृतिप्रधान करण्यासाठी राज्यातील सर्व प्रकारच्या शाळांमध्ये केंद्र शासनाच्या ‘स्कूल बॅग पॉलिसी-2020’ची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन त्यांच्या शारीरिक वजनाच्या साधारणतः 10 टक्क्यांपेक्षा अधिक असू नये, याची (Maharashtra Daptarmukti Abhiyan) दक्षता घेण्याच्या सूचना शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी यांनी परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत.

दप्तराचे अधिक वजन असल्याने विद्यार्थ्यांच्या पाठीचा कणा, खांदे तसेच शारीरिक वाढीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना अनावश्यक ओझे वाहावे लागू नये, यासाठी शाळांनी योग्य नियोजन करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

या (Maharashtra Daptarmukti Abhiyan) धोरणानुसार पूर्व-प्राथमिक वर्गातील लहान विद्यार्थ्यांना शक्यतो शाळेत दप्तर आणण्याची आवश्यकता भासणार नाही, यासाठी शाळांनी नियोजन करावे. तसेच मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दररोज अनावश्यक पाठ्यपुस्तके, वह्या किंवा इतर शैक्षणिक साहित्य आणण्यास सांगू नये. त्या दिवसाच्या तासिकेनुसार आवश्यक तेवढीच पुस्तके आणि साहित्य आणले जाईल, यासाठी वर्गनिहाय ‘दप्तर वेळापत्रक’ तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

विद्यार्थ्यांना दररोज सर्व पुस्तके घरी नेण्याची गरज पडू नये, यासाठी शाळांनी वर्गखोल्यांमध्ये कपाटे, शेल्फ किंवा लॉकरची सुरक्षित व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ आणि पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आणि ‘स्कूल बॅग पॉलिसी’नुसार इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्षात 10 दिवसांचा दप्तरविरहित कालावधी आयोजित करण्यात यावा. या कालावधीत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृती, अनुभवाधारित शिक्षण आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून शिकण्याची संधी देण्यावर भर देण्यात आला आहे. या (Maharashtra Daptarmukti Abhiyan) निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी होण्यासोबतच शिक्षण अधिक आनंददायी आणि अनुभवाधारित होण्यास मदत होणार आहे.