एमपीएससी पद भरती प्रक्रिया

65 हजार 866 सरकारी पदांची भरती रखडली; उमेदवारांमध्ये असंतोष

MPSC Recruitment Process: राज्यातील विविध शासकीय विभागांमधील तब्बल 65 हजार 866 रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेला विलंब होत आहे. अनेक विभागांकडून आवश्यक मागणीपत्रे अद्याप पूर्णपणे सादर नाही...

65 हजार 866 सरकारी पदांची भरती रखडली; उमेदवारांमध्ये असंतोष

MPSC Recruitment Process

 

विभागांकडून मागणीपत्रे सादर न झाल्याने प्रक्रियेला विलंब

मुंबई (MPSC Recruitment Process) : राज्यातील विविध शासकीय विभागांमधील तब्बल 65 हजार 866 रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेला विलंब होत आहे. अनेक विभागांकडून आवश्यक मागणीपत्रे अद्याप पूर्णपणे सादर करण्यात आलेली नसल्याने भरतीची प्रक्रिया अपेक्षित वेगाने पुढे सरकलेली नाही. त्यामुळे सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.

उपलब्ध माहितीनुसार, एकूण रिक्त पदांपैकी 46 हजार 464 पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) भरण्याचे (MPSC Recruitment Process) नियोजन आहे. याशिवाय 16 हजार 896 पोलीस शिपाई पदे आणि 2 हजार 506 शिक्षकांची पदे अनुक्रमे संबंधित भरती यंत्रणा व पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरण्यात येणार आहेत. मात्र, एमपीएससीमार्फत भरण्यात येणाऱ्या 46 हजार 464 पदांच्या तुलनेत विविध विभागांनी आतापर्यंत सुमारे 7 हजार पदांसाठीच मागणी नोंदविल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यातील पाणीपुरवठा, वैद्यकीय शिक्षण, कृषी, महसूल, वित्त, विधी व न्याय, गृह, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्रशिक्षण आणि सहकार या विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त आहेत. काही विभागांनी रिक्त पदांच्या तुलनेत अत्यल्प पदांसाठीच भरतीची मागणी सादर केल्याचेही समोर आले आहे.

पाणीपुरवठा विभागात सर्वाधिक 8 हजार 652 पदे रिक्त आहेत. मात्र, त्यापैकी केवळ 67 पदांसाठी एमपीएससीकडे मागणी नोंदविण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण विभागात 7 हजार 868, तर कृषी विभागात सुमारे 6 हजार पदे रिक्त असल्याची माहिती आहे. विधी व न्याय विभागात 2 हजार, तर उच्च व तंत्रशिक्षण आणि सार्वजनिक बांधकाम विभागात प्रत्येकी सुमारे 1 हजार 500 पदे रिक्त आहेत.

दरम्यान, एमपीएससीच्या विविध परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणामुळे उमेदवारांमध्ये नाराजी निर्माण झाली असून, या पार्श्वभूमीवर उमेदवारांनी आंदोलन केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनकर्त्या उमेदवारांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणांची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर राज्यातील रिक्त पदांच्या भरतीचा आढावा घेण्यात आला. सर्व संबंधित विभागांनी रिक्त पदांची माहिती आणि भरतीसाठी आवश्यक मागणीपत्रे तातडीने सादर करावीत, असे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व विभागांकडून माहिती संकलित झाल्यानंतर प्रत्येक विभागातील नेमकी किती पदे भरली जाणार, याचे स्पष्ट चित्र समोर येणार आहे.

संबंधित सामग्री

MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय

MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय

MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली करण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीसांच्या आश्वासनानंतर सामान्य प्रशासन विभागाने आदेश जारी केला.

Oct 02, 2026
MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 पुढे ढकलली; सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर होणार

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 पुढे ढकलली; सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर होणार

MPSCने राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 पुढे ढकलली. स्थापत्य अभियांत्रिकी आणि गट-ब मुख्य परीक्षेलाही स्थगिती; सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर होणार.

Sep 29, 2026
MPSC राज्यसेवा २०२५च्या मुलाखती पुढे ढकलल्या; २०२६ मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांबाबत विद्यार्थ्यांचा संभ्रम कायम

MPSC राज्यसेवा २०२५च्या मुलाखती पुढे ढकलल्या; २०२६ मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांबाबत विद्यार्थ्यांचा संभ्रम कायम

MPSC राज्यसेवा २०२५च्या मुलाखती पुढे ढकलल्या. आता राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६च्या प्रश्नपत्रिकांबाबत विद्यार्थ्यांनी नव्याने पेपर सेट करण्याची मागणी केली आहे.

Sep 17, 2026
MPSC चा मोठा निर्णय; गट-क पूर्व परीक्षा पुन्हा लांबणीवर

MPSC चा मोठा निर्णय; गट-क पूर्व परीक्षा पुन्हा लांबणीवर

MPSC Exam: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 पुन्हा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. 25 ऑक्टोबर 2026 रोजी होणारी परीक्षा आता 3 जानेवारी 2027 रोजी घेण्यात येणार

Sep 10, 2026
MPSC औषध निरीक्षक भरती परीक्षा रद्द; पेपरफुटीच्या तक्रारीनंतर आयोगाचा मोठा निर्णय

MPSC औषध निरीक्षक भरती परीक्षा रद्द; पेपरफुटीच्या तक्रारीनंतर आयोगाचा मोठा निर्णय

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) अन्न व औषध प्रशासनातील ‘औषध निरीक्षक’ (गट-ब) पदासाठी राबविण्यात आलेली भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

Aug 26, 2026