NEET-PG डॉ. ओम तायडे

NEET-PG परीक्षेत डॉ. ओम उत्तम तायडे यांचे उल्लेखनीय यश; ऑल इंडिया रँक १५२१

NEET-PG Dr. Om Tayade: तालुक्यातील जामठी येथील डॉ. ओम उत्तम तायडे यांनी NEET-PG परीक्षेत ऑल इंडिया रँक १५२१ मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल जामठीसह परिसरातून त्यांचे अभिनंदन

NEET-PG परीक्षेत डॉ. ओम उत्तम तायडे यांचे उल्लेखनीय यश; ऑल इंडिया रँक १५२१

NEET-PG Dr. Om Tayade

बुलढाणा (NEET-PG Dr. Om Tayade) : तालुक्यातील जामठी येथील डॉ. ओम उत्तम तायडे यांनी NEET-PG परीक्षेत ऑल इंडिया रँक १५२१ मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल जामठीसह परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. डॉ. ओम तायडे यांनी पुणे येथील बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून (B. J. Government Medical College, Pune) MBBS पदवी पूर्ण केली. MBBS नंतर त्यांनी तब्बल एक वर्ष अत्यंत मेहनत, सातत्य आणि जिद्दीने NEET-PG परीक्षेची तयारी केली. विशेष म्हणजे त्यांनी ही तयारी घरी राहून केली.

त्यांच्या अथक परिश्रमाचे फलित म्हणून NEET-PG परीक्षेत त्यांनी ऑल इंडिया रँक १५२१ मिळवली. आता प्रतिष्ठित वैद्यकीय महाविद्यालयातून MD Medicine पूर्ण करून वैद्यकीय क्षेत्रात पुढे जाण्याचा त्यांचा मानस आहे. भविष्यात गरीब, गरजू तसेच ग्रामीण भागातील रुग्णांची सेवा करण्याचे त्यांचे ध्येय आहे. डॉ. ओम तायडे (NEET-PG Dr. Om Tayade) हे जामठी गावचे सुपुत्र असून त्यांचे वडील उत्तम तायडे यांनी देशसेवेसाठी CRPF मध्ये २९ वर्षे सेवा बजावली आहे. देशसेवेची शिस्त, समर्पण आणि सेवाभावाची प्रेरणा कुटुंबातूनच मिळाल्याचे डॉ. ओम तायडे यांच्या यशातून दिसून येते.

त्यांच्या या यशामुळे तायडे कुटुंबीय, जामठी ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून डॉ. ओम तायडे (NEET-PG Dr. Om Tayade) यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी आणि समाजसेवेच्या वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.ता.प्र.

टैग्स: NEETPG Dr Om Tayade